ठाणे : शहरातील ऐतिहासिक ठाणे मध्यवर्ती कारागृह अन्यत्र स्थलांतर करण्याच्या हालचालींना वेग आला असून यासंबंधी पालिका प्रशासनाने सहा वर्षांपुर्वी राज्य शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रस्तावानुसार कारागृहाच्या जागेवर उद्यान उभारण्याचा विचार सुरू आहे. त्यास भाजपचे आमदार संजय केळकर यांनी विरोध करत हे उद्यान उभारण्यामागे बिल्डर लॉबीचा डाव असल्याचा आरोप केला आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी करत ठाणेकरांची अस्मिता जपण्यासाठी या निर्णयाविरुद्ध लोकचळवळ उभारू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यानिमित्ताने आमदार केळकर यांनी नगरविकास विभागाला घरचा आहेर दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> बेकायदेशीरित्या बांधून ठेवलेले देशी-विदेशी जातीचे १२ श्वान जप्त

ठाणे मध्यवर्ती कारागृह हे ब्रिटिश काळापासून आहे. या कारागृहाला क्रांतीकारकांचा इतिहास आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या कारागृहाला यापुर्वीच पुरातन वास्तुचा दर्जा मिळाला आहे. वाढत्या शहरीकरणामुळे कारागृह हे शहराच्या मध्यभागी आले आहे. शहरातील हा परिसर महत्वाचा मानला जातो. ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या बाह्य तट भिंतीपासून दिडशे मीटर परिघातील अनेक अधिकृत इमारती आहेत. परंतु कारागृहाच्या परिसरातील बांधकाम निर्बंधांमुळे या इमारतींचा पुर्नविकास अडथळे निर्माण होत आहेत. यातूनच तत्कालीन पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात ऐतिहासिक ठाणे मध्यवर्ती कारागृह घोडबंदरला स्थलांतरीत करून कारागृहाच्या जागेवर टाऊन सेंटर विकसित करण्यासंबंधीचा प्रस्ताव पालिकेने शासनाकडे पाठविला होता. प्रत्यक्षात मात्र त्याचे पुढे काहीच झाले नव्हते. आता राज्याच्या गृह विभागाने नियुक्त केलेल्या स्थायी समितीने नियम आणि अटींचे बंधन घालून बांधकाम प्रकल्पांना मान्यता देण्यास सुरुवात केली असून यामुळे येथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. असे असतानाच, आता ठाणे मध्यवर्ती कारागृह अन्यत्र स्थलांतर करण्याच्या हालचालींना वेग आला असून यासंबंधी पालिका प्रशासनाने सहा वर्षांपुर्वी राज्य शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रस्तावानुसार कारागृहाच्या जागेवर उद्यान उभारण्याचा विचार सुरू आहे. त्यास भाजपचे आमदार संजय केळकर यांनी विरोध करत हे उद्यान उभारण्यामागे बिल्डर लॉबीचा डाव असल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा >>> इमारतीवरील लोखंडी पत्र्याचे शेड वाऱ्याने उडाले, टर्फवर खेळणारी सात मुले जखमी

आमदार केळकर यांचा विरोध

ठाणे कारागृहाची कैदी-क्षमता चार हजारापर्यंत असताना येथे दहा हजारांच्या आसपास कैदी आहेत. त्यामुळे येथील यंत्रणेवर आणि सुविधांवर ताण पडतो. त्यामुळे येथे शेतीसाठी असलेल्या जागेवर विस्तारित बहुमजली कारागृह उभारण्याबाबत येथे नियुक्त झालेल्या अधिक्षकांनी वेळोवेळी प्रस्ताव दिले आहेत. त्यामुळे या जागेवर विस्तारित बांधकाम केल्यास अतिरिक्त ताण दूर होऊ शकेल. या उपरही गरज वाटल्यास भिवंडीत विस्तारित कारागृह उभारता येईल. त्यासाठी हे ऐतिहासिक आणि ठाणेकरांना प्रेरणादायी कारागृह अर्थात ठाणे किल्ला पाडून भव्य पार्क उभारण्याची गरज नाही. या कारागृहात म्युरल्सच्या रूपाने इतिहास जागवणाऱ्या स्मारकाचे काम प्रस्तावित आहे. तसेच २९३ वर्षे जुन्या ठाणे किल्ल्याचा एक दगडही इतिहासप्रेमी ठाणेकर पाडू देणार नाहीत. त्यासाठी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवू, शिवाय लोक चळवळ उभारू, या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आमदार केळकर यांनी म्हटले आहे. ठाण्यात नमो पार्क हे भव्य उद्यान असताना ऐतिहासिक ठाणे किल्ला पाडून दुसरे पार्क कशासाठी? ठाण्यात अनेक उद्याने ही ओस पडली आहेत. त्याचे सुशोभीकरण आणि संवर्धन केल्यास ठाणेकरांना त्याचा लाभ होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government soon to take decision on historical thane central jail shifting another place zws
Show comments