ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचे फुटबॉल प्रेम सर्वश्रुत आहे. पक्ष बैठकांच्या निमित्ताने ते कुठेही गेले तरी त्यांना भेटायला फुटबॉलपटू येतात. पण मनविसे पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाला मान देऊन ते रविवारी ठाण्यात क्रिकेट खेळले आणि त्यात त्यांनी एकावर एक असे अनेक चौकार षटकार लगावले. मनसे नेते अमित ठाकरे यांचा महासंवाद दौरा सुरू असून त्यासाठी ते रविवारी ठाणे शहरात आले होते.

हा दौरा आटोपल्यानंतर मनविसे पदाधिकाऱ्यांनी त्यांना क्रिकेट खेळण्याचा आग्रह धरला. त्याला मान देऊन ते ढोकाळी नाका येथील शरदचंद्र पवार मिनी स्टेडियम येथे मनविसे पदाधिकाऱ्यांसोबत क्रिकेट खेळले. पदाधिकाऱ्यांच्या दोन टीममध्ये हसत खेळत हा क्रिकेट सामना रंगला. मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे, मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे, संघटक यश सरदेसाई ,शहरअध्यक्ष अरूण घोसाळकर यांच्यासह ठाण्यातील मनविसेचे अनेक पदाधिकाऱ्यांसमवेत अमित ठाकरे हा क्रिकेट सामना खेळले. विशेष म्हणजे, क्रिकेट सामन्यानंतर सर्वजण फुटबॉल सामनाही खेळले. खेळून दमल्यानंतर अमित ठाकरे यांनी सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांसाठी नाश्ता मागवला.

amit thackeray on raj thackeray cried
“…तेव्हा मी राज ठाकरेंच्या डोळ्यात पहिल्यांदा अश्रू बघितले”, अमित ठाकरेंनी सांगितला भावनिक प्रसंग!
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
raj thackeray latest news
काँग्रेसबरोबर युती करण्यावरून राज ठाकरेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले, “मी, माझा स्वार्थ, माझी खुर्ची अन्…”
Raj Thackeray Criticized Sharad Pawar Again
Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “शरद पवार हे तालुक्याचे नेते, जाणते राजे वगैरे..”
Sharad Pawar and Raj Thackeray meeting in Khadakwasla and Hadapsar Constituency
हडपसर, खडकवासला मतदारसंघात पवार ठाकरेंच्या तोफा धडाडणार, एकमेकांना काय उत्तर देणार !
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची टीका, “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला..”
raj thackeray criticized uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंच्या हातून पैसा सुटत नाही, बॅगेत काय असणार?” राज ठाकरेंची खोचक टीका!
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “उद्धव ठाकरेंकडून बाण गेला आणि फक्त खान राहिले आहेत, कारण..”