नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून सहा उमेदवार रिंगणात असले तरी बविआचे क्षितिज ठाकूर आणि शिवसेना-भाजप महायुतीचे विजय पाटील यांच्यातील लढतीकडे सर्वाच्या नजरा लागून होत्या. प्रत्यक्ष मतदानापूर्वी प्रचारकाळात उभय बाजूंच्या समर्थकांमध्ये समाजमाध्यमांतून जबरदस्त खडाजंगी झाली होती. या पाश्र्वभूमीवर वसई आणि नालासोपारात या मतदारसंघांत कोण बाजी मारणार याकडे मतदारांचे होते. अखेर या लढतीत क्षितिज ठाकूर यांनी बाजी मारली आहे. त्यांनी एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना तब्बल ३३ हजार १७७ मतांनी धूळ चारली. या निवडणूकीत त्यांना ९७ हजार ८४० मते मिळाली तर ६४ हजार ६६३ मते मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई मतदारसंघाचे विभाजन होऊन नालासोपारा या स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती झाली. नालासोपारा आणि विरार शहरांचा मिळून हा मतदारसंघ तयार झालेला आहे. ऑगस्ट २०१९ पर्यंत केलेल्या मतदार नोंदणीनुसार या मतदारसंघाची मतदार संख्या पालघर जिल्हय़ातील सर्वाधिक म्हणजे ५ लाख १२ हजार ३५७ एवढी आहे. या मतदारसंघात आतापर्यंत २००९ आणि २०१४ अशा दोन विधानसभांच्या निवडणुका झाल्या. या दोन्ही निवडणुकीत वसईतील पालिकेतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला. बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर हे येथील आमदार आहेत. त्यामुळे नालासोपारा मतदारसंघ हा बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला मानला जात होता. विरारमधील स्थानिक वाडवळ, भंडारी, सोमवंशी क्षत्रिय, आगरी, किनारपट्टीवरील कोळी आदी स्थानिक मराठी भूमीपुत्र मुंबईतून येऊन स्थिरावलेला मराठी कोकणी मध्यमवर्गीय या मतदारसंघात आहे. मात्र हा मतदारसंघ ओळखळा जातो तो उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या परप्रांतीयांसाठी. नालासोपारा पूर्वेला हजारोंच्या संख्येने परप्रांतीयांच्या वसाहती आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 019 result kshitij thakur pradeep sharma mppg 94