ठाणे – विधानसभा निवडणुकांचे हंगाम सुरू झाला असून या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. तसेच जाहिरनामे सादर केले जात आहेत. मतदारांना वळवण्यासाठी विविध धोरणे राबवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र लाखोंच्या संख्येने रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचाराच्या रणधुमाळीत आम्ही आहोत कुठे ? असा प्रश्न पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाणे जिल्ह्यात विधानसभेचे १८ मतदारसंघ आहेत. यापैकी बहुसंख्य मतदार संघ हे रेल्वे स्थानकांना खेटून आहेत. मध्य रेल्वेने मध्यंतरी प्रकाशित केलेल्या आकड्यांनुसार एकटया ठाणे रेल्वे स्थानकातून सात लाख प्रवासी प्रवास करतात. ठाण्यापासून डोंबिवली पर्यंत आणि कसारा, कर्जत पर्यंत रेल्वे स्थानकांतून लाखो प्रवाशांचा राबता असतो. लोकसभा निवडणुकीत निवडून येणारे खासदार रेल्वे प्रश्नांशी संबंधित विषय मांडतील अशी अपेक्षा असली तरी विधानसभा निवडणुकीतही रेल्वे स्थानकात आणि आसपासच्या प्रश्नांची दखल घेतली जावी अशी अपेक्षा रेल्वे प्रवासी आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांनी लोकसत्ताशी बोलताना केली. बदलापूर, कर्जत, वांगणी, अंबरनाथ, कल्याण- डोंबिवली या स्थानकांतील प्रवाशांशी चर्चा केली असता, लोकसभा निवडणुकीतच आमच्या प्रश्नांची चर्चा झाली नाही किमान विधानसभा निवडणुकीत तरी या प्रश्नांची ऊहापोह होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

हे ही वाचा… निवडणूक प्रचारासाठी ठाण्यात ९४ रथांना परवानगी

मध्य रेल्वेच्या प्रवाशांमधील अनेक प्रवासी हे कल्याण, डोंबिवली, कर्जत, कसारा भागातून येतात. या प्रवाशांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असतो. सकाळ आणि सायंकाळच्यावेळी लोकल गाड्यांमध्ये चढता येत नाही, तोल जाऊन अपघात होणे अशा घटना दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. याच बरोबर लोकल गाड्यांचा अनियमितपणा, तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे गाड्या बंद होणे, भिक्षेकरी, गर्दुल्यांचा त्रास असे प्रकार सतत घडत असतात. रेल्वे स्थानकात होणारी गर्दी, चोरीच्या घटना अशा नानाविध समस्यांना रेल्वे प्रवासी सामोरे जात असतात. मात्र या समस्यांवर लोकसभा निवडणुकीच्यावेळीही बोलण्यात आले नव्हते. आणि विधानसभेच्यावेळी देखिल असेच काहीसे दृश्य दिसून येत आहे. त्यामुळे प्रचारात आम्ही आहोत कुठे असा सवाल आरोही यादव, रोहन कडव, प्रथमेश रोठे या प्रवाशांनी उपस्थित केला.

दिवा, डोंबिवलीत स्थानिक अस्मिता रेल्वे प्रश्न मात्र गायब

कल्याण ग्रामीण, डोंबिवली या सारख्या विधानसभा क्षेत्रात मोडत असलेल्या कोपर, डोंबिवली या सारख्या स्थानकांमध्ये तेथील फलाटांचा प्रश्न, फाटकांवर होणारे अपघात, स्कायवाॅकवरील फेरीवाले, रेल्वे स्थानक परिसारातील सोयी सुविधांच्या नियोजनाचा अभाव यामुळे प्रवासी त्रस्त आहेत. दिवा स्थानकात तर दररोज शेकडोंच्या संख्येने प्रवाशांची भर पडत आहे. या ठिकाणी उभ्या असलेल्या बेकायदा बांधकामांमधून स्वस्त घरे विकत आणि भाड्यानेही मिळतात. त्यामुळे दिवा उपनगराला गेल्या काही वर्षात एका लहान शहराचे स्वरूप प्राप्त झाले असून हा संपुर्ण भार रेल्वे स्थानक आणि आसपासच्या परिसरावर पडत आहे. येथील प्रचारात मात्र स्थानिक भुमीपुत्र, कोकणातील अस्मिता बेकायदा बांधकामांचे संरक्षण असे मुद्दे अधिक चर्चेत असल्याची प्रतिक्रिया निरंजन चव्हाण, ऋतिका मोरे, जगदिश थोरात या प्रवाशांनी व्यक्त केली.

हे ही वाचा… ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात

विधानसभा निवडणुकीत रेल्वेच्या उपनगरीय लोकल प्रवाशांच्या हालअपेष्टा आणि त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी, ‘आम्ही आपले आमदार’ म्हणून राज्य शासनाद्वारे या उपाययोजना राबवू असे ठाम वचन जाहीर पणे देणारा एकही उमेदवार दिसत नाही हे दुर्दैवी आहे. निदान मुंबईसह उपनगरातील भावी आमदारांमध्ये तरी लाखो प्रवाशांसाठी संवेदनशीलता असायला हवी. – मनोहर शेलार, सदस्य, उपनगरीय रेल्वे प्रवासी सल्लागार समिती, मध्य रेल्वे

मुंबई आणि उपनगरांमध्ये ९५ लाखापर्यंत रेल्वे प्रवासी आहेत. यामुळे तरूण पिढीं जीवघेणा प्रवास करित आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी रेल्वे प्रवाशांकडे दुर्लक्ष केले होते. आणि आता विधानसभेच्या वेळी देखील असाच प्रकार सुरु आहे. राज्य शासनाने आणि लोक प्रतिनिधींनी रेल्वे प्रवाशांना गृहीत धरलेले आहे. प्रवाशांनी दररोज त्रास दायक, असुरक्षित प्रवास करायचा का ? त्याबद्दल कोणालाही खंत नाही हे यावरून सिद्ध होत आहे. या सर्व गोष्टींमुळे लोक मतदान करत नाहीत. यामुळे मतदानाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यांच्या बाबतीत कोणत्याही पक्षाने जाहिरनामा दिलेला नाही हे खुप दुर्दैव आहे. – लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरीय रेल्वे महिला प्रवासी महासंघ

हे ही वाचा… कल्याणमध्ये महिला पोलिसाला दिराकडून बेदम मारहाण

लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असणाऱ्या रेल्वेच्या समस्यांकडे पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी दररोज जीवघेणा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी कशी कमी करता येईल यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. – नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संस्था

रेल्वे स्थानकावर होणारे चोरीचे गुन्हे, महिला सुरक्षेचा प्रश्नावर कुठेही बोलले जात नाही आहे. लोकल गाड्या, स्थानकांवर होणारी गर्दी त्यात होणारे अपघात यावर उपयायोजना करायला हवी. – आदित्य पंडित, प्रवासी, कल्याण

बदलापूर पासून मुंबईपर्यंत प्रवास करायचा तर रेल्वेशिवाय इतर प्रवासाची साधन नाहीत. त्यात दररोजच लोकल गाड्या दिलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास तर कधी-कधी तासभर उशिराने धावतात. मुंबईहून परतताना कल्याणला लोकल गाड्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेससाठी थांबवल्या जातात. लोकल गाड्यांची संख्या आणि अनिश्चित वेळा यामुळे प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. याबद्दल लोकप्रतिनिधींना काहीही फिकीर नाही. – स्वप्निल जाधव, प्रवासी, बदलापूर