ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघामध्ये २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. यामध्ये २०१४, २०१९ मध्ये विधानसभा निवडणुक लढविलेल्या जुन्याच चेहऱ्यांना राजकीय पक्षांनी पुन्हा संधी दिल्याचे दिसून येते. यामुळे पाच वर्षांपुर्वीप्रमाणेच मतदार संघांमध्ये दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढती होणार असल्याचे बोलले जात आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात उमेदवार जुनेच, लढत मात्र नवीन असे चित्र आहे.

ठाणे जिल्हयात एकूण १८ विधानसभा मतदार संघ येत असून याठिकाणी एकूण २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. २०१४ आणि २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकांमध्ये विजयी झालेले आणि पराजीत झालेले अशा उमेदवारांना राजकीय पक्षांनी पुन्हा संधी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याचे दिसून येते. भिवंडी ग्रामीणमध्ये शिंदेच्या शिवसेनेने विद्यमान आमदार शांताराम मोरे यांना उमेदवारी दिली आहे तर, त्यांच्याविरोधात ठाकरे गटाने महादेव घाटाळ यांना उमेदवारी दिली असून त्यांनी २०१४ मध्ये मोरे यांच्याविरोधात राष्ट्रवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणुक लढविली होती. त्यावेळे मोरे यांनी त्यांचा पराभव केला होता.

MP Suresh Mhatre on the stage of Samajwadi partys for riyaz azmi
काँग्रेसचा उमेदवार असतानाही बाळ्या मामा समाजवादीच्या व्यासपीठावर
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Ashish Shelar Raj Thackeray
Ashish Shelar : अमित ठाकरेंनंतर भाजपाचा मनसेच्या आणखी एका उमेदवाराला पाठिंबा, कंबर कसून प्रचार करण्याचे आदेश
Vishal Patil Jayashree Patil in Sangli Assembly Constituency Election 2024
Sangli Vidhan Sabha Election 2024 : सागंलीत दादा घराणे पुन्हा ताकद दाखविणार ?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”

आणखी वाचा-जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत वाढ, २० दिवसांत ७३ हजार मतदारांची भर

शहापूरमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) दौलत दरोडा विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार गट) असा सामना पुन्हा पाहायला मिळणार आहे. गेल्या तीन निवडणुकीत हे दोघांमध्ये एकमेकांविरोधात निवडणुक लढतात आणि त्यांचे पक्ष मात्र प्रत्येक निवडणुकीत वेगळे असतात. भिवंडी पुर्वेत सपाचे उमेदवार रईस शेख विरुद्ध शिंदेच्या सेनेचे उमेदवार संतोष शेट्टी यांच्यात गेलीवेळी अटीतटीची लढत झाली होती. यंदाच्या निवडणुकीत हे दोघे पुन्हा एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. भिवंडी पश्चिमेत भाजपने आमदार महेश चौगुले यांना तर, कल्याण पश्चिमेत शिंदेच्या शिवसेनेने आमदार विश्वनाथ भोईर यांना पुन्हा उमेदवारी दिली असून यंदाच्या निवडणुकीत या दोघांविरोधात मात्र नव्या चेहऱ्यांना विरोधकांनी संधी दिली आहे.

मुरबाड मतदार संघामध्ये २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी राष्ट्रवादीचे नेते गोटीराम पवार यांचा पराभव केला होता. यंदा राष्ट्रवादी (शरद पवार गट) ने गोटीराम पवार यांचे पुत्र सुभाष पवार यांना कथोरे यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. अंबरनाथ मतदार संघामध्ये शिंदेच्या सेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार राजेश वानखेडे यांच्यात २०१४ मध्ये लढत झाली होती. या निवडणुकीत किणीकर दोन हजार मतांनी विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत किणीकर विरुद्ध वानखेडे अशी लढत होणार आहे. उल्हासनगरमध्ये गेल्या तीन निवडणुकीत भाजपचे आमदार कुमार आयलानी विरुद्ध ज्योती आणि सुरेश (पप्पु) कलानी असा सामना दिसून आला. यंदाच्या निवडणुकीत सुरेश कलानी यांचे पुत्र ओमी कलानी विरुद्ध आयलानी अशी लढत होणार आहे.

आणखी वाचा-कल्याणमध्ये सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या तीन जणांवर गुन्हे

कल्याण पुर्वेत भाजपने आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे तर, ठाकरे गटाने नवी चेहऱ्याला संधी देत धनंजय बाबुराव बोडारे यांना उमेदवारी दिली आहे. डोंबिवलीमध्ये भाजपने मंत्री रविंद्र चव्हाण यांना चौथ्यांदा उमेदवारी दिली असून त्यांच्याविरोधात २०१४ मध्ये निवडणुक लढविणारे दिपेश म्हात्रे यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. कल्याण ग्रामीणमध्ये मनसेने आमदार प्रमोद पाटील यांना उमेदवारी दिली आहे तर, ठाकरे गटाने माजी आमदार सुभाष भोईर यांना उमेदवारी दिली आहे. मिरा-भाईंदरमध्ये गेल्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता, काँग्रेसचे उमेदवार मुझफ्फर हुसैन आणि अपक्ष उमेदवार गीता जैन यांच्यात लढत होणार आहे.

ओवळा-माजिवडा मतदार संघात शिंदेच्या सेनेने आमदार प्रताप सरनाईक यांना चौथ्यांदा उमेदवारी दिली असून त्यांच्याविरोधात मनसेचे संदीप पाचंगे आणि ठाकरे गटाचे नरेश मणेरा हे निवडणुक लढवत आहेत. पाचंगे यांनी मागील निवडणुक लढविली होती. कोपरी-पाचपाखाडी मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चौथ्यांदा निवडणुक लढवित असून त्यांच्याविरोधात ठाकरे गटाने केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. तर, यापुर्वी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुक लढलेले मनोज शिंदे हे अपक्ष निवडणुक लढवित आहेत. ठाणे शहर विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार संजय केळकर, मनसेचे नेते अविनाश जाधव हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, या मतदार संघांचे यापुर्वी आमदार राहिलेले ठाकरे गटाचे राजन विचारे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

आणखी वाचा-भिवंडीत निवडणूक भरारी पथकाकडून दोन कोटीची रक्कम जप्त

कळवा-मुंब्रा मतदार संघात राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे चौथ्यांदा निवडणुक लढवित असून त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी (अजित पवार) गटाने नवी चेहऱ्याला संधी देत माजी नगरसेवक नजीब मु्ल्ला यांना उमेदवारी दिली आहे. ऐरोली मतदार संघात भाजपचे आमदार गणेश नाईक, अपक्ष उमेदवार विजय चौगुले हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याठिकाणी ठाकरे गटाने मनोहर कृष्ण मढवी यांना उमेदवारी दिली आहे. बेलापूरमध्ये भाजपने आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी दिली असून त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी (शरद पवार गटाने) संदीप नाईक यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे पाच वर्षांपुर्वीप्रमाणेच मतदार संघांमध्ये दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढती होणार असल्याचे बोलले जात आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात उमेदवार जुनेच, लढत मात्र नवीन असे चित्र आहे.