डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील सर्वाधिक वर्दळीच्या महात्मा फुले रस्ता आणि घनश्याम गुप्ते रस्त्यांवर आणि त्यांच्या छेद रस्त्यांवर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीचा सर्वाधिक त्रास नोकरदार वर्ग, शाळकरी विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी येत्या एक डिसेंबरपासून हे दोन्ही मार्ग एक दिशा करण्याचा निर्णय घेतला आहे.

या दोन्ही रस्त्यांच्या एक दिशा मार्गांमुळे या रस्त्यांवरील वाहतूक लगतच्या सुभाष रस्ता, पंडित दिनदयाळ रस्ता भागातून वळविण्यात येणार आहे. हा वाहतूक बदल सुरूवातीचे पंधरा दिवस प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येईल. या वाहतूक बदलाला नागरिकांकडून हरकत न आल्यास हा वाहतूक बदल कायमस्वरुपी ठेवण्यात येणार आहे, असे उपायुक्त शिरसाट यांनी वाहतूक बदल अधिसूचनेत म्हटले आहे. डोंबिवली पश्चिमेतील वर्दळीच्या गुप्ते रस्ता, फुले रस्ता आणि या रस्त्यांच्या छेद रस्त्यांवर दररोज वाहतूक कोंडी होत असल्याने रिक्षा चालक मालक संघटनेने दोन महिन्यापूर्वी आंदोलनाचा इशारा दिला होता.

in pune katraj person with country made pistol arrested by Crime Branchs Anti Robbery Squad
पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
cases have been registered by the police against those selling food on handcarts by blocking roads and footpaths In Kalyan
कल्याणमध्ये रस्ते, पदपथ अडवून हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे

हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात भाजपची सरशी

वाहतूक बदल

डोंबिवली पश्चिमेत घनश्याम गुप्ते रस्त्यावर गोपी चौकातून डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना गोपी चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने गोपी माॅलसमोरील नाना शंकरशेठ रस्त्याने कोल्हापुरे चौक येथून महात्मा फुले रस्ता, सुभाष रस्ता किंवा सम्राट चौक येथून दिनदयाळ रस्त्याने इच्छित स्थळी जातील. महात्मा गांधी रस्त्यावर महात्मा फुले चौक येथे डोंबिवली रेल्वे स्थानकाकडून कोल्हापुरे चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना फुले चौक येथे प्रवेश बंद. ही वाहने डोंबिवली रेल्वे स्थानक विष्णुनगर मासळी बाजार गुप्ते रस्ता, दिनदयाळ रस्ता किंवा क्रांती चौक येथून सुभाष रस्त्याने इच्छित स्थळी जातील. गुप्ते छेद रस्ता क्रमांक एककडून गोमांतक बेकरीमार्गे उजवे वळण घेऊन रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांना गोमांतक बेकरी येथे प्रवेश बंद. ही वाहने गोमांतक बेकरी येथे डावे वळण घेऊन गोपी चौक रस्ता, नाना शंकरशेठ रस्ता, फुले रस्ता, सुभाष रस्ता, दिनदयाळ रस्तामार्गे इच्छित स्थळी जातील.

हेही वाचा…मुख्यमंत्रिपदी शिंदेच हवेत, ठाण्यातील मंदिरांमध्ये शिंदे गटाची आरती

गुप्ते छेद रस्ता क्रमांक दोन येथून अंबामाता मंदिरमार्गे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांना अंबामाता मंदिर येथे प्रवेश बंद. ही वाहने अंबामाता समाज मंदिरमार्गे डावे वळण घेऊन गोपी चौकमार्गे फुले रस्ता अथवा दिनदयाळ रस्त्याने इच्छित स्थळी जातील. गुप्ते छेद रस्ता क्रमांक तीन येथून लक्ष्मी विलास हाॅटेलमार्गे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांना लक्ष्मी विलास हाॅटेल येथे प्रवेश बंद. ही वाहने लक्ष्मी विलास हाॅटेल येथे वळण घेऊन फुले रस्ता, दिनदयाळ रस्तामार्गे इच्छित स्थळी जातील. कर्वे रस्त्यावरून महात्मा फुले रस्त्यावरील माॅन्जिनीज चौक येथून कोल्हापुरे चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना माॅन्जिनीज चौक येथे प्रवेश बंद. ही वाहने सुभाष रस्ता, गुप्ते किंवा दिनदयाळ रस्त्याने इच्छित स्थळी जातील. गुप्ते रस्त्यावरून माॅन्जिनीज चौकमार्गे फुले रस्त्यावरून कोल्हापुरे चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना माॅन्जिजन्स चौक येथे प्रवेश बंद. ही वाहने सुभाष रस्ता, गुप्ते रस्ता किंवा दिनदयाळ रस्त्याने इच्छित स्थळी जातील.