कल्याण : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात मागील अनेक वर्षापासून रात्रीच्या वेळेत वेश्या व्यवसाय चालतो. रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांसमोर, एसटी आगार परिसरात, वलीपीर रस्त्यावरील नाला आणि स्वच्छतागृहाजवळ वेश्या व्यवसाय सुरू असल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत होते. महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गुरुवारी रात्री कल्याण रेल्वे स्थानक भागात छापा टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या १३ पीडित महिला, या महिलांचे नेतृत्व करणाऱ्या चार गल्ला प्रमुखांना पोलिसांंनी अटक केली.

पीडित महिलांचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये तीन महिला आणि एक पुरूषाचा समावेश आहे. १३ पीडित महिलांना चार प्रमुख जण वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत होते. १३ पीडित महिलांची पोलिसांनी उल्हासनगर येथील सुधारगृहात रवानगी केली. चार प्रमुख गल्लाप्रमुखांना पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिला भिवंडी, विठ्ठलवाडी, मानपाडा परिसरातील रहिवासी आहेत. काही महिला मुळच्या नेपाळमधील मूळ रहिवासी आहेत.

हेही वाचा…६५ लाखांचा मुद्देमाल तक्रारदारांना हस्तांतरीत उल्हासनगर परिमंडळ चारच्या पोलिसांची कामगिरी, १८० गुन्ह्यांची उकल

कल्याण पोलीस परिमंडळ हद्दीत एकही अनैतिक धंदा दिसता कामा नये, असे आदेश पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. उपायुक्तांचे कठोर आदेश असल्याने महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांकडून गुरुवारी रात्री एक बनावट ग्राहक पाठविण्यात आले. तेथे पैसे घेऊन वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने तात्काळ त्या अड्ड्यावर छापा टाकला. पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या तीन प्रमुख महिला. एक पुरूष आणि १३ पीडित महिला यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

हवालदार मनोहर चित्ते यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याने १४ जणांवर गु्न्हा दाखल करण्यात आला. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वेश्या व्यवसायावर पोलिसांनी कारवाई केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कल्याण रेल्वे स्थानक भागात रात्रीच्या वेळेत भुरटे चोर, गांजा सेवन करणारे, मद्यपी यांची वर्दळ असायची. या टोळ्या रात्रीच्या वेळेत रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना लुटत होत्या.

हेही वाचा…कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळीचा, मोबाईल तपासणीसाठी फाॅरेन्सिक प्रयोगशाळेकडे

उपायुक्त झेंडे यांनी शहराच्या विविध भागातील गस्त वाढवली आहे. रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर रेंगाळणाऱ्यांवर खाकी वर्दीचा हिसका पोलिसांकडून दाखविला जात आहे. स्वता उपायुक्त झेंडे अचानक विविध भागात फेरफटका मारत आहेत. सार्वजनिक ठिकाणी रेंंगाळणाऱ्यांना ‘खाकी वर्दीचा प्रसाद’ दिला जात आहे. डोंबिवली पश्चिम स्कायवाॅकवर रात्रीच्या वेळेत अनेक वेश्या रेंगाळत असतात. त्यांच्या कारवाईची नागरिकांची मागणी आहे.

Story img Loader