उन्हाच्या वाढत्या काहिलीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी सध्या काही तरी थंड खाण्याकडे लोकांना कल आहे. त्यामुळे बाटलीबंद थंडपेय, लिंबू, आवळा, कोकम सरबते, पन्हे, फालुदा, आईस्क्रीम आदी पदार्थाना साहजिकच खूप मागणी आहे.

थंड पदार्थाच्या या भाऊगर्दीत काही कॉर्नर आपल्या वैशिष्टय़पूर्ण चवीमुळे विशेष लोकप्रिय आहेत. डोंबिवली पूर्व विभागात चाररस्ता येथील महावीर बदाम शेक अँण्ड फालुदा त्यापैकी एक. हातगाडीवजा एका छोटय़ाशा जागेत असलेल्या या कॉर्नरने गेल्या १५ वर्षांत डोंबिवलीकरांचा विश्वास संपादन केला आहे.
महावीरमध्ये फालुद्याचे अनेक प्रकार मिळतात. रोज, चॉकलेट, मँगो, बटरस्कॉच आदी प्रकारचा फालुदा येथे मिळतो. मात्र स्पेशल केशर फालुदा हे या दुकानाचे वैशिष्टय़ आहे. या दुकानाचे मालक जमुनालाल माली स्वत: घरच्या घरी बदामशेक तयार करतात. फालुदा बनविण्यासाठी दररोज ३० ते ४० किलो बदाम मिक्सरमधून वाटून घेतला जातो. त्यामुळे येथील बदामशेक कधीही पातळ नसतो. जाड बदामशेक आणि भरपूर ड्रायफ्रुट हेच त्यांच्या फालुद्याचे विशेष आहे. केवळ रात्रीच्या तीन ते चार तासांमध्ये ४५ किलो बदामशेक त्यांच्याकडे सहज संपतो.
फालुदा खाताना ‘बदामशेक जादा घालो भाई’ अशी फर्माईश अनेक जण करतात, असे जमुनालाल यांनी गमतीने सांगितले. शिवाय मँगो, चॉकलेट, मलाई. स्ट्रॉबेरी आदी प्रकारचे आईसस्क्रीम फालुद्यामध्ये टाकल्यामुळे फालुदा अधिक चविष्ट बनतो. सुरुवातीच्या काळात पातळ दूध घातलेला फालुदा विकत असल्याचे जमुनालाल यांनी सांगितले. नंतरच्या काळात ते बदामशेक फालुदा विकू लागले. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे त्यांच्या दुकानातील खवय्यांची गर्दी वाढली. एकमेकांच्या शिफारशीने ‘महावीर’ फालुद्याची कीर्ती शहरभर पसरली. सध्या गरमीच्या दिवसात बरेच जण रात्री फेरफटका मारण्यास बाहेर पडतात. ‘महावीर’चा बोर्ड दिसला की अनेकांची पाऊले फालुदा खाण्यासाठी दुकानाकडे वळतात. साधारणपणे एका रात्रीमध्ये ४५ लिटर बदामशेक सहज संपतो. शिवाय त्यासाठी चांगल्या प्रतीचे दूध वापरले जाते. फालुद्यात टुटी फ्रुटी अधिक वापरली जाते. तसेच खिसमिस, मनुके आदींचा वापर केला जातो. अन्न विभागाकडून परवानगी घेऊनच व्यवसाय चालवत असल्याचे त्यांनी सागितले. तसे परवाना पत्रही त्यांच्याकडे आहे. हातगाडीवरचा व्यवसाय असला तरी येथील खाद्य पदार्थाचा दर्जा आणि शुद्धता राखण्यात जमुनालाल यशस्वी झाले आहेत.
फालुद्याप्रमाणे या दुकानात मिळणारे आईस्क्रीमही खास आहे. सध्या सीझन असल्याने आईस्क्रीम लगेच संपून जाते. कारण खवय्ये घरी पार्सल घेऊन जातात. एका ग्राहकाने तर एकदम शंभर ग्लास फालुदा नेल्याची आठवणही जमुनालाल यांनी सांगितली. रात्री मित्रमंडळींसोबत फेरफटका मारणाऱ्या तरुणांचा हा अड्डा आहे. येथे उभे राहून फालुदा खाताखाता गप्पा मारणाऱ्या तरुणांचे अनेक ग्रुप्स दिसतात. त्यामुळे एका वेळी दोन ग्लास सहज संपतात. पूर्ण ग्लासची किंमत ४५ रुपये तर अध्र्या ग्लासची किंमत ३० रुपये इतकी आहे. आईस्क्रीमही १० ते १५ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. साधारणपणे रात्री नऊ वाजता थंडाव्याची ही खाद्यमैफल सुरू होते. रात्री बारापर्यंत येथे ग्राहकांचा राबता असतो. जमुनालाल यांचा सकाळचा वेळ या बदामशेक बनविण्याच्या तयारीत जातो. त्यानंतर हा बदामशेक गार होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवतात. कधी कधी ऑर्डरही घेतल्या जातात. मात्र ही ऑर्डर घेताना माणसांची संख्या अधिक असेल तर घेत असल्याचे त्यांनी सांगितले. याचे मुख्य कारण बदामशेक बनविण्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि जर माणसे कमी असली तर मात्र त्याचा फायदा होत नाही, असे जमुनालाल यांनी सांगितले. रोज, बटरस्कॉच, चॉकलेट फालुद्यामध्येही हाच बदामशेक वापरला जातो. गारेगार करणारा हा फालुदा खवय्ये फक्त उन्हाळ्यातच खातात असे नाही तर कडाक्याच्या थंडीतही आवडीने फालुदा खाणारेही बरेच खवय्ये आहेत. घरी कुणी पाहुणे आले, तर जेवल्यावर त्याला बाहेर फिरायला आणून महावीरच्या फालुद्याचा आस्वाद घेण्याची अतिथ्यशीलता काही डोंबिवलीकर दाखवितात. उशिराने येणारे चाकरमानी येथून घरी पार्सल घेऊन जातात.

unseasonal rain, Vidarbha, temperature, rain ,
विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Panchgani Mahabaleshwar tourism, Panchgani ,
पाचगणी, महाबळेश्वरच्या पर्यटनाला ‘थंड’ प्रतिसाद; निवडणुकांचा फटका
in state increase demand of electricity in winter
ऐन हिवाळ्यात विजेची विक्रमी मागणी…असे काही घडले की ज्यामुळे….
Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
health benefits of Tilache Laddoos
हिवाळ्यात भरपूर प्रमाणात तिळाचे लाडू का खावेत? वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत तज्ज्ञांनी सांगितले फायदे
Loksatta viva Cultural significance of Makar Sankrant Fashion food
ढील दे ढील दे रे भैय्या
tribal students protest nashik
नाशिक : निकृष्ट भोजन निषेधार्थ आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन

कुठे- महावीर बदामशेक अ‍ॅण्ड फालुदा,
चार रस्ता डोंबिवली (पूर्व)
कधी- रात्री ९ ते रात्री १२ वाजता

Story img Loader