लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली- येथील पश्चिमेतील महावितरण कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञाला आणि त्याच्या सहकाऱ्याला जुनी डोंबिवलीतील एका वीज ग्राहक आणि त्याच्या भावाने शिवीगाळ करत बुधवारी मारहाण केली. या दोन्ही भावांच्या विरुध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात महावितरण कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Police Create Reel with Colleagues
पोलीस अधिकाऱ्याने सहकाऱ्यांबरोबर बनवली Reel, नेटकऱ्यांचे जिंकले मन, पाहा Viral Video
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
1 thousand 201 complaints received on C Vigil App within a month for violation of code of conduct
आचारसंहिता भंग होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ; सी-व्हिजील ॲपवर महिन्याभरात १ हजार २०१ तक्रारी प्राप्त
"Worked Overtime": Gen Z Employee's Excuse For Coming Late The Next Day Boss and employee chat viral on social media
PHOTO: “मी उद्या उशीराच येणार…” कर्मचाऱ्यानं बॉसला मेसेज करत थेटच सांगितलं; चॅट वाचून नेटकरी म्हणाले “बरोबर केलं जशास तसं”
Chennai Doctor Attack
Chennai : कॅन्सरग्रस्त महिलेच्या मुलाचा डॉक्टरवर चाकुने हल्ला; मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
Bigg Boss Marathi Fame Nikki Tamboli And Arbaz Patel trip together
Bigg Boss नंतर निक्की-अरबाजची एकत्र पहिली ट्रिप! ‘या’ ठिकाणी गेलेत फिरायला, फोटो आले समोर

तेजस शिर्के, शुभम शिर्के अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले, जुनी डोंबिवलीतील खंडोबा मंदिरा जवळ राहणारे वीज ग्राहक पी. एस. देसाई यांच्या नावे वीज मीटर आहे. या वीज मीटरचा वापर करणाऱ्या रहिवाशांकडे वीज देयकाची थकबाकी होती. महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ अमोल दुड्डे यांनी यापूर्वी थकबाकीदार वीज ग्राहकाला मोबाईलवर लघुसंदेश पाठवून देयक भरण्याचे कळविले होते. त्यावेळी त्यांनी ही रक्कम तात्काळ भरतो असे महावितरण कर्मचाऱ्यांना कळविले होते.

आणखी वाचा-डोंबिवली रस्त्यावरील कमानींच्या कोंडीत

आश्वासन देऊनही संबंधित थकबाकीदार देयक भरणा करत नव्हता. वरिष्ठांनी संबंधित ग्राहकाच्या घरी जाऊन वीज देयक भरण्याची सूचना करावी आणि रक्कम भरणा केली नाहीतर वीज पुरवठा खंडित करुन वीज मीटर काढून आणण्याची सूचना अमोल यांना बुधवारी दुपारी केली. वरिष्ठ तंत्रज्ञ अमोल दुड्डे, त्यांचा अन्य एक सहकारी आकाश गायकवाड हे वीज मीटर असलेल्या देसाई यांच्या घरी गेले. त्या घरात तेजस शिर्के, शुभम शिर्के राहत असल्याचे महावितरण कर्मचाऱ्यांना आढळले.

आणखी वाचा- कोपर खाडीत कांदळवनाची कत्तल, रेती उपशाला बंदी, महसूल, पोलिसांचे आदेश

अमोल यांनी तेजसला वीज देयक भरण्यास सांगितले. त्यावेळी तेजसने देयक भरणार नाही, असे ओरडून कर्मचाऱ्याला सांगितले. तेजस देयक भरणा करत नसल्याने अमोल, आकाश यांनी तेजसच्या घराचा वीज मीटर काढून घेतला. त्याचा राग तेजसला आला. त्याने महावितरण कर्मचाऱ्यांना अडवून तुम्ही मीटर का काढला, असे दरडावून विचारले. तेवढ्यात तेथे तेजसचा भाऊ शुभम आला. दोघांनी मिळून शिवीगाळ करत अमोल दुड्डे यांना मारहाण केली. दोन्ही कर्मचाऱ्यांची वाट आरोपींनी अडवून ठेवली. ही माहिती साहाय्यक अभियंता ई. ए. शेख यांना समजताच ते तात्काळ घटनास्थळी आले. त्यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना विष्णुनगर पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी अमोलच्या तक्रारीवरुन तेजस, शुभम विरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला.