ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड त्यांचे खासगी स्वीय साहाय्यक अभिजीत पवार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी विक्रम खामकर, हेमंत वाणी यांच्यासह सात जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या हल्ल्यानंतर आहेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – मनपा अधिकारी महेश आहेर हल्ला प्रकरण: जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

काय म्हणाले महेश आहेर?

“आव्हाडांना जीवे मारण्याची जी क्लिप व्हायरल झाली आहे, ती क्लिप मी ऐकलेली नाही, त्यामुळे तो आवाज कोणाचा हे मी नक्की सांगू शकत नाही. पण ५ जानेवारी २०२३ रोजी मी एका व्यक्तीविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यावेळी पोलिसांकडे मी एक पेनड्राईव्ह सादर केला होता. ज्यामध्ये काही ऑडियो क्लिप होत्या. या ऑडिओ क्लिपमध्ये त्याने माझ्या हत्येची सुपारी घेतली असून तो जितेंद्र आव्हाडांच नाव घेत होता. याप्रकरणी मी गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटकही करण्यात आली होती”, अशी माहिती महेश आहेर यांनी दिली.

हेही वाचा – “एखाद्या डॉन प्रमाणे…” ऋता आव्हाड यांचे ठाणे मनपा अधिकाऱ्यावर गंभीर आरोप, म्हणाल्या…

जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप

“मी २०१९ पासून मुंब्रामध्ये सहाय्यक आयुक्त आहे. मी अनेकदा अनाधिकृत बांधकामं तोडली आहे. ही बांधकाम तोडू नये, यासाठी माझ्यावर मोठ्या प्रमाणात दबाव होता. मला आणि माझ्या परिवाराला शिवीगाळ केली जात होती. मी जेव्हा अतिक्रमण विभागाचा पदभार घेतला, तेव्हा माझ्या मतदारसंघात मला विचारल्या शिवाय कारवाई करू नये, असे मला आव्हाडांनी सांगितले होते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या मी येत्या काही दिवसांत पुढे आणेल”, असेही ते म्हणाले. तसेच मला आणि माझ्या कुटुंबियांना जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपासून धोका आहे. त्यांनी मला वेळोवेळी त्रास दिला आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – महेश आहेर यांच्या केबिनमध्ये पैशांची थप्पी, जितेंद्र आव्हाडांनी व्हिडीओ केला ट्वीट; म्हणाले…

काय आहे प्रकरण?

जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केला आहे, अशा संभाषणाची एक क्लिप व्हायरल झाली. या क्लिपमधील संभाषण सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचं असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर महेश आहेर यांना पालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांनी येऊन त्यांना मारहाण केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahesh aher allegation on jintendra awhad after attacked ncp leaders spb