ठाणे : भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धामणकरनाका येथील वऱ्हाळदेवी जलशुध्दीकरण केंद्रात देखभाल, निगा आणि दुरुस्तीची अत्यावश्यक सेवेतील कामे शनिवार, १५ फेब्रुवारीपासून हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे ऐन उन्हाळ्यात भिवंडीत पुढील पाच दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
भिवंडी निजामपूर शहर महापालिका क्षेत्रात धामणकरनाका येथील वऱ्हाळदेवी ५ दशलक्ष लीटर जलशुध्दीकरण केंद्र आहे. या केंद्रातून भिवंडी शहरात पाणी पुरवठा करण्यात येतो. या केंद्रात देखभाल, निगा आणि दुरुस्तीचे अत्यावश्यक सेवेतील कामे शनिवार, १५ फेब्रुवारीपासून हाती घेण्यात येणार आहेत. यामुळे भिवंडीतील काही भागात पुढील पाच दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
यामध्ये पद्मानगर, गायत्रीनगर, रामनगर, नवजीवन कॉलनी, बीएनएन कॉलेज रोड, पटेल कंम्पाऊंड गल्ली नं. १,२,३, भैयासाहेव आंबेडकरनगर, न्युप्रकाशनगर, माधवनगर, सोमानगर, विठ्ठलनगर, गंगाराम वाडी, लकडा चाळ, न्यु टावरे कंम्पाऊंड, दुधवावडी, हाफिजनगर, आलमगीर विडीओ परिसर, न्यु इंस्लामावाद, आझमीनगर, खालील शेठ चाळ, हांडीकंम्पाऊंड समरुवाग, इदगाहरोड, कारीवली रोड, दर्गारोड, मोमिन बाग, कोतवालशाह, मृतूजा कंम्पाऊंड, धोवीतलाव, वायु चुनिवाला बिल्डींग, टावरे वाडी, चारचाळी, हमालवाडा, तंडेल मोहल्ला, बंदर मोहल्ला, सोदार मोहल्ला, मुकरी शाह, सुतारआळी, भोईवाडा, भुसार मोहल्ला, ब्राम्हणआळी, कासारआळी, पोस्ट ऑफिस जवळ, बाजारपेठ, हफसन आळी, जैतुनपूरा, कापतलाव, समदशेठ बगीचा, बंगालपुरा, धोवी मोहल्ला, सोनापूर, तेली मोहल्ला, कॅशरबाग, ठाणारोड, बोबडे मोहल्ला, गौरीपाडा, भुसार मोहल्ला, खजुर पूरा, नाचन कंम्पाऊंड, समदनगर, कणेरी, पायल टॉकीज जवळ, अजंठा कंम्पाऊंड १ व २, धामनकर नाका, वॉटर सप्लाय कॉलनी, ठाणगेआळी, तीनवत्ती, फैजान कंपा, मेहता कंपाउन्ड, रोशनवाग, देऊनगर टावरे कंपाउन्ड, निजामपूरा या भागांचा समावेश आहे. कमी दाबाने पाणी पुरवठा होणाऱ्या काळात नागरीकांनी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संदिप पटणावर यांनी केले आहे.