– नवीन साकेत व कशेळी पूलाचे काम ६ टक्केच पूर्ण, ११८२ कोटीचा प्रकल्प अपूर्ण स्थितीत
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
–
ठाणे : ठाणे तसेच आसपासच्या शहरांसह नाशिक जिल्ह्यातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई-नाशिक महार्गावरील माजिवाडा ते वडपे या मार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून रख़डले असून त्याचबरोबर या मार्गावरील नवीन साकेत व कशेळी पूलाचे काम ६ टक्केच पूर्ण झाल्याने ११८२ कोटीचा प्रकल्प अपूर्ण स्थितीत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. अपुर्ण अवस्थेत असलेल्या या प्रकल्पामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने ठरवून दिलेल्या वेळेत या रस्त्याचे काम करण्याची मागणी करत ठरवून दिलेल्या वेळेत काम पुर्ण केले नाहीतर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.
हेही वाचा >>> ठाण्यात धूर आणि धूळ प्रदूषण करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई
ठाणे शहरातून माजिवडा ते वडपे या राष्ट्रीय महामार्गे मुंबई, ठाणे, नाशिक, गुजरात आणि पनवेल या शहरांच्या दिशेने वाहतूक सुरु असते. त्यात अवजड वाहनांसह इतर वाहनांचा समावेश असून या वाहनांची संख्या मोठी आहे. माजिवडा ते वडपे या २३.५ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग ३ च्या रस्त्याचे आठ पदरीकरणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून ठाण्यासह मुंबईकरांनाही दोन-दोन तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या कामातील हालगर्जीपणाचा फटका मात्र सर्वसामन्य ठाणेकरांना बसत आहे. तर नवीन साकेत आणि कशेळी पूलाचे काम तर केवळ ६ टक्केच झाले आहे, असा आरोप मनसेचे जनहित विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी केला आहे. या रस्त्याचे काम मुदतीत पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी महिंद्रकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच एमएसआरडीसी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. या रस्त्यावरून दररोज लाखो वाहने वाहतूक करतात. केवळ प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे हा प्रकल्प गेल्या तीन वर्षांपासून रखडलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण संबंधित ठेकेदार, एमएसआरडीसी प्राधिकरण यांच्याकडून नियोजित वेळेत काम पूर्ण करून घेण्यास असमर्थ ठरत आहे. हा प्रकल्प मुदतीत पुर्ण केला नाहीतर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
माजिवडा ते वडपे राष्ट्रीय महामार्गाचे आठपदरीकरण आणि नवीन साकेत व कशेळी पुलाचे काम २०१९ मध्ये सुरु करण्यात आले. या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने प्रथम अमईपी इनफ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आले होते. पण हे काम करण्यास असमर्थ असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे काम एसएसआरडीसीला २०२१ ला सोपिवण्यात आले. माजीवडा ते वडपे या मार्गावरील काही जागा ही वनविभागाकडे येत असल्यामुळे त्यांच्या परवानगी घेण्यात आल्या आहेत. आता या मार्गावरील रस्त्याचे काम करण्यासाठी कोणत्याही अडचणी नसून डिसेंबर २०२३ अखेर लवकरच या आठपदरीकरण रस्त्याचे व पूलाचे काम पूर्ण करण्यात येईल.
मुकूंद अत्तरदे –प्रकल्प व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, ठाणे