सिक्कीममध्ये गेलेल्या ठाण्यातील नागरिकांच्या गाडीचा भीषण अपघात झालाय. यात एकाच कुटुंबातील चौघांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

ठाण्यातील एकाच कुटुंबातील हे चार सदस्य फिरण्यासाठी गुरुवारी (२८ मे) विमानाने सिक्कीमला गेले. तेथे त्यांनी भाडेतत्वावर एक कार घेतली. मात्र, प्रवास ही कार एका दरीत कोसळून भीषण अपघात झाला. हा अपघात इतका गंभीर होता की कारमधील पाचही व्यक्तींचा मृत्यू झाला. मागील १५ वर्षापासून हे कुटुंब ठाण्यात रहात होतं.

अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं

१. सुरेश पन्नालालजी पुनमिया
२. तोरल सुरेश पुनमिया
३. हिरल सुरेश पुनमिया
४. देवांश सुरेश पुनमिया
५. जयन अमित परमार

सिक्कीममधील अपघातात मृत्यू झालेले पुनमिया कुटुंबातील चार सदस्य

सोमवारी (३० मे) अपघातात मृत्यू झालेल्या सर्वांचे मृतदेह ठाण्यात आणले जाणार आहेत.

Story img Loader