तब्बल चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर डोंबिवली एमआयडीसीमध्ये लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामन दलाला यश आले आहे. येथील मानपाडा परिसरात असणाऱ्या अल्ट्रा प्युअर फेम या केमिकल कंपनीत सकाळी साडेनऊच्या सुमारास ही आग लागली होती. या आगीने सुरूवातीपासूनच भीषण स्वरूप धारण केले होते. कंपनीशेजारी असणाऱ्या सिलेंडरच्या गोदामामुळे ही आग आणखीनच भडकण्याची शक्यता होती. मात्र, अग्निशामन दल आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांनी वेळीच गोदामातील १५३ सिलेंडर्स सुरक्षित स्थळी हलविल्याने हा अनर्थ टळला. दरम्यान, सध्या आग नियंत्रणात आली असली तरी या परिसरात मोठ्याप्रमाणावर धूर पसरला आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशामन दलाच्या तब्बल १२ गाड्या घटनास्थळावर कार्यरत होत्या.

Story img Loader