ठाणे : विधानसभा निवडणूकीसाठीचे मतदान पार पडले असून आता सर्वांचे लक्ष हे मतदानाच्या निकालाकडे लागले आहे. मतदान मोजणीची प्रक्रिया शनिवारी पार पडणार आहे. त्यामुळे मतमोजणीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये आणि परिसरातील वाहतूक सुरळित तसेच सुनिश्चित राहण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी या शहरांमध्ये मोठे वाहतूक बदल करण्यात आले आहेत. हे वाहतूक बदल शनिवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. तसेच काही मतमोजणी केंद्रा बाहेर वाहन उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यात १८ विधानसभा मतदार संघ असून या सर्व मतदार संघात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी दरम्यान केंद्राबाहेर उमेदवार तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांची ये-जा सुरु असते. त्यामुळे मत मोजणी केंद्राजवळील परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. मतमोजणी प्रक्रिया सुरळित पार पडावी आणि या प्रक्रियेचा त्रास नागरिकांना होऊ नये या अनुषंगाने वाहतूक विभागाकडून जिल्ह्यातील काही शहरांमध्ये वाहतूक बद्दल करण्यात आले आहेत.
हेही वाचा…उल्हासनगर: तीन वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला
ठाणे शहरात असे असतील वाहतूक बदल
जुगागाव कैलासनगर कडील सर्व प्रकारची वाहने ही धर्मवीर चौक हुन उजवीकडे वळुन आय. टी. आय कॉलेज मार्गे २२ नंबर सर्कलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना धर्मवीर चौक येथे प्रवेश बंदी असेल ही वाहने जुनागाव कैलासनगर कडुन धर्मवीर चौकातुन उजवीकडे वळून आय.टी.आय. कॉलेज मार्गे २२ नंबर सर्कल जाणारी सर्व प्रकारची वाहने ही धर्मवीर चौकातून सरळ रोड नं २८ ने हनुमान नगर चौकातून उजवीकडे वळुन वागळे बस डेपो मार्गे साठे नगर चौक रोड नं २२ येथुन इच्छित स्थळी जातील. तसेच हनुमान नगर परीसरातील सर्व वाहने व वागळे बस डेपो येथील सर्व बसेस साठे नगर चौकातुन रोड नं २२ ने इच्छित स्थळी जातील रोड नं.१६ कागुन २२ नं सर्कल टाटा फायजन कट आय टी आय कॉलेज, धर्मवीर चौक, रामनगर, हनुमान नगर कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना २२ नंबर सर्कल येथे प्रवेश बंदी असेल ही वाहने रोड नं.१६ कडून २२ नं सर्कल आय. टी. आय कॉलेज धर्मवीर चौक रामनगर, हनुमान नगर कडे जाणारी वाहने ही २२ नंबर सर्कल येथुन डावीकडे आणि उजवीकडे वळण घेवुन इच्छित स्थाळी जातील.