ठाणे : महापालिका क्षेत्रात डांबरी आणि काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. या रस्ते कामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरिक्षण पुर्ण करावे, अशा सुचना आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच आय आय टी या त्रयस्थ संस्थेकडून रस्त्यांची कामे प्रमाणित झाल्यावरच कंत्राटदारांची देयके द्यावीत, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते बांधणीच्या कामांसाठी ६०५ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने दिला आहे. त्यातून संपुर्ण शहरात २८३ रस्ते बांधणीची कामे सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात १२७ तर, दुसऱ्या टप्प्यात १५६ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी काही रस्त्यांची कामे पुर्ण झाली आहेत तर, काही रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यात डांबर, मास्टीक आणि काँक्रीट रस्ते कामांचा समावेश आहे. राज्य सरकारने दिलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून ठाणे शहरात सुरु असलेली रस्त्यांची कामे दर्जात्मक व्हावी यासाठी आयुक्त बांगर हे आग्रही आहेत.

sarva karyeshu sarvada 2024 Information about ngo bhatke vimukt vikas pratishthan
सर्वकार्येषु सर्वदा : भटक्या जमातींना रस्ता शोधून देण्यासाठी धडपड
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Contractors are going to be charged twice as much for the deteriorated road repair work in Pimpri
पिंपरीतील रस्तेदुरुस्तीची निकृष्ट कामे; ठेकेदारांवर…!
Why change in sugar control order is needed after 58 years
साखर नियंत्रण आदेशात ५८ वर्षांनी बदलाची गरज का? नवीन तरतुदी काय आहेत?
Nashik compensation land, Farmers Action Committee Nashik,
नाशिक : जागेचा मोबदला न मिळाल्यास रस्त्यांवर नांगर – मनपा आयुक्तांना शेतकरी कृती समितीचा इशारा
Pointing out lack of coordination in development system Nitin Gadkari reprimanded officials
विकास यंत्रणातील असमन्वयाकडे लक्ष वेधत गडकरी यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान
Pune, Bhagyashree Navatke, Economic Offenses Wing, Jalgaon, embezzlement, bhaichand hirachand raisoni, BHR Credit Union, Home Department,
‘बीएचआर’ पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणात संशयित आरोपीची गृहखात्याकडे तक्रार
Navi Mumbai, helpers municipal schools Navi Mumbai,
नवी मुंबई : महापालिका शाळांमध्ये मदतनीसांची कमतरता; सखी सावित्री समितीचा अहवाल देण्याचे निर्देश

हेही वाचा >>> “त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करा अथवा…”; आमदार शिंगणेंच्या ‘यु टर्न’बाबत शरद पवारांचं विधान, म्हणाले…

ठाणे शहरात यापुर्वी झालेल्या अनेक विकासकामांच्या दर्जाविषयी सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असून या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रस्ते कामांचे त्रयस्थ संस्थेकडून लेखापरिक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई आयआयटी या संस्थेच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकाने शहरातील रस्ते कामांची पाहाणी सुरु करून तेथील नमुने तपासणीसाठी घेतले होते. या कामांचे लेखापरिक्षण सुरू आहे. दरम्यान, या रस्ते कामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरिक्षण पुर्ण करावे, अशा सुचना आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच आय आय टी या त्रयस्थ संस्थेकडून रस्त्यांची कामे प्रमाणित झाल्यावरच कंत्राटदारांची देयके द्यावीत, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.