डोंबिवली: डोंबिवलीतील एका २९ वर्षाच्या तरुणाने सलग ६१ दिवस दररोज ४२ किलोमीटर धाऊन एकूण दोन हजार ५७३ किलोमीटर धावेचा टप्पा सोमवारी सकाळी डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात पूर्ण केला. यापूर्वीच्या एका धावपटूचा विक्रम मोंडीत काढून आपल्या विक्रमी धावेची गिनिज बुकमध्ये नोंद केली.

हेही वाचा >>> “रस्ता आमच्या मालकीचा आणि..”, डोंबिवली रेल्वे स्थानकावर रिक्षा चालकांचा उर्मटपणा

Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
History of Geographyn History of the Earth Geological timescale
भूगोलाचा इतिहास: खडकातील पाऊलखुणा!
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
western railway recovers 80 crore fine from ticketless passengers
विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली; सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई
How many hurdles in India way to host Olympics 2036
ऑलिम्पिक २०३६ आयोजनासाठी भारताच्या मार्गात किती अडथळे? सौदी, तुर्कीये, कतारचे आव्हान किती खडतर?
Tulsi Vivah 204 Date Time Puja Vidhi Shubh Muhurat in Marathi
Tulsi Vivah 2024 Date Time: १२ की १३, तुळशी विवाह नक्की कधी? जाणून घ्या योग्य तारीख, तिथी आणि शुभ मुहूर्त

विशाक कृष्णस्वामी असे या तरुणाचे नाव आहे. विक्रम पूर्ण करताच त्याचे डोंबिवलीतील विविध क्षेत्रातील नागरिकांनी कौतुक केले. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी पहाटे तीन वाजता सावळाराम महाराज क्रीडासंकुलात येऊन विशाकला विक्रम पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. विक्रम पूर्ण करताच विशाकचा खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनतर्फे सन्मान करण्यात आला. पालिकेतर्फे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी संतोष केणे, ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे राजेश कदम, प्रकाश माने, सागर जेधे उपस्थित होते. विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी, मैदानात नियमित फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी विशाकचा सन्मान केला. विशाकचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>> ठाणे: चोरट्यांकडून एकाची पाचव्या मजल्यावरून धक्का देऊन हत्या; पोलिसांकडून आरोपीला अटक

१ सप्टेंबर पासून विशाक दररोज सकाळी डोंबिवलीतील घरडा सर्कल जवळील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात पहाटे तीन वाजता यायचा. मुसळधार पाऊस असला तरी त्याने आपल्या नियमित उपक्रमात खंड पडू दिला नाही. एक तास व्यायाम केल्यानंतर तो चार वाजता धावण्यास सुरुवात करायचा. ४२ किमीची धाव पूर्ण करण्यासाठी तो सलग साडे चार ते पाच तास असा सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत दररोज धावायचा. वाणिज्य शाखेचा पदव्युत्तर पदवी असलेला विशाक विमा कंपनीत नोकरी करतो. सावळाराम महाराज क्रीडासंकुलाची धावण्याची मार्गिका ५४० मीटर लांबीची गोलाकार पध्दतीने आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड व्यवस्थापनाला आपल्या उपक्रमाची पूर्व माहिती देऊन गिनिज व्यवस्थापनाच्या देखरेखीखाली विशाक दररोज धावत होता. मैदानात प्रवेश केल्यापासून ते धाव पूर्ण करेपर्यंतची अद्ययावत माहिती ऑनलाईन माध्यमातून विशाक गिनिज व्यवस्थापनाला त्याने दिली. त्याच्या या उपक्रमावर देखरेख, त्याची ऑनलाईन माहिती तपासणीसाठी एक पर्यवेक्षक गिनिज संस्थेने नियुक्त केला होता.

हेही वाचा >>> कळव्यात इमारतीचा स्लॅब कोसळून तीन जण जखमी; इमारतीमधील सदनिका खाली करण्याचे पालिकेचे आदेश

विक्रम मोडीत

दररोज ४१.१९५ किमी ६० दिवसात धावण्याचा विक्रम करुन भारतामधील अशीष कासोडेकर यांनी गिनिज बुकात नोंद केली आहे. हा विक्रम मोडण्याचा निर्धार विशाकने केला होता. मागील सात वर्षापासून विशाक धावण्याचा सराव करत आहे. या सरावातून त्याने देशातील अनेक मॅरेथाॅन स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्यात त्याला यश आले आहे.

“यापूर्वीच्या धावपटूचा गिनिज बुकातील दररोज ४२ किमी ६० दिवसात धावण्याचा विक्रम आज मी मोडला. अजून दोन दिवस धावण्याचा क्रम सुरू ठेवणार आहे. विक्रमाची सर्व अद्ययावत माहिती गिनिज संस्थेला दिली आहे. मुसळधार पाऊस, गारवा याची कोणती पर्वा न करता केलेल्या खडतर परिश्रमाचे हे फळ आहे. ”

– विशाक कृष्णस्वामी, धावपटू