शनिवार, रविवार या आठवडय़ाच्या शेवटच्या दिवसांना लागून सोमवारी आलेली प्रजासत्ताक दिनाची सुटी साजरी करण्यासाठी रहिवाशांनी कौटुंबिक सहलीची आखणी केली असली तरी बहुसंख्य लोकांची पाऊले मॉलकडे वळणार आहेत. मॉल व्यवस्थापनानेही या तीन दिवसांच्या सुटीचा फायदा करून घेण्यासाठी विविध वस्तू, कपडे आणि बडय़ा ब्रॅण्डवर घसघशीत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. सुटीचे दिवस ठाण्याबाहेर घालविण्यापेक्षा मॉलमध्ये खरेदीचा आनंद लुटा, अशी जाहिरात आता व्यवस्थापनांनी सुरू केली आहे.
तीन दिवसांची सुटी सत्कारणी लागावी यासाठी मॉल व्यवस्थापनांनी जोरदार तयारी सुरू केली असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या सवलतींचा रतीब मांडला आहे.
ठाण्यातील प्रमुख मॉलच्या व्यवस्थापनांनी घरात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर विशेष सवलती दिल्या आहेत.
स्टार बाजार, बिग बाझार यांसारख्या बडय़ा दुकानांमध्ये स्वस्त खरेदीचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पूर्व द्रुतगती महामार्गास लागूनच असलेल्या व्हिव्हिआना मॉलच्या व्यवस्थापनाने यानिमित्ताने ‘ग्रेट फॅशन’ नावाचा उपक्रम आयोजित केला आहे. या माध्यमातून ब्रॅण्डेड वस्तूंच्या खरेदीवर भरगच्च सवलत देण्यात येणार आहे. या मॉलमध्ये तीनही दिवस ‘वीकएण्ड सेलिब्रेशन’ ठेवण्यात आले असून यासाठी रॉकबॅण्ड, संगीताच्या अन्य कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त या ठिकाणी खरेदी करणाऱ्यांसाठी लॉटरीच्या माध्यमातून ‘सेल शेव्हरले’ ही गाडीजिंकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा