कल्याण- कल्याण-भिवंडी रस्त्यावरील कोन गावात एका चार वर्षाच्या बालिकेवर याच गावातील एका तरुणाने घरात लपून येऊन पाच दिवसापूर्वी अतिप्रसंग केला. मंगळवारी या बालिकेला पोटातील वेदन असह्य होऊ लागल्यानंतर घडला प्रकार उघडकीला आला. भिवंडी हद्दीतील कोन गाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी तरुणा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोन गाव पोलिसांनी तपासाची सुत्रे हलवून सागर छात्री (२६) या तरुणाला अटक केली आहे. त्याच्या विरुध्द बलात्कार, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> कल्याणमध्ये सराफांना लुटणाऱ्या दोन सख्ख्या बहिणी उल्हासनगर मधून अटक
पोलिसांनी सांगितले, चार वर्षाची बालिका आपले आई,वडिल, भावासह कोन गावात राहते. आरोपी तरुण सागर हा याच गावात राहतो. आरोपी सागर आणि पीडित बालिकेच्या कुटुंबांशी ओळख होती. तो अनेक वेळा पीडितेच्या घरी कौटुंबिक नात्यासारखा येऊन जात होता. सागर आपल्या मुली बरोबर काही गैरप्रकार करील असे कधीच पीडितेच्या कुटुंबीयांना वाटले नाही.
३१ जुलै रोजी रात्रीच्या वेळेत पीडितेच्या घरचे भोजन होऊन कुटुंबीय झोपण्याच्या तयारीत होते. पीडितेचे वडील कामावर गेले होते. आई स्वयंपाक घरात आवराआवर करत होती. लहान भाऊ झोपी गेला होता. पीडित मुलगी शय्या खोलीत झोपली होती. पीडित मुलगी झोपल्याच्या भागात कोणी नाही. याचा गैरफायदा घेऊन आरोपी सागर पीडितेच्या आईची नजर चुकवून खोलीत आला. त्याने पीडितेवर अतिप्रसंग केला. पीडितेला खूप वेदना होऊन पोटात दुखू लागले. म्हणून आई स्वयंपाक घरातून बाहेर आली. त्यावेळी घाईने सागर घरातून काही न बोलता निघून गेला. सागरने मुली बरोबर काही गैरप्रकार केल्याचा संशय आईला आला नाही.
हेही वाचा >>> कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; आरोपीस अटक, कठोर कारवाईची मागणी
दुसऱ्या दिवशी पहाटे पीडितेच्या वेदना वाढल्या. तिला वेदना असह्य होऊ लागल्याने आईने विचारपूस केली. त्यावेळी सागरने आपल्या बरोबर गैरप्रकार केल्याचे तिने आईला सांगितले. हे एकून आईला धक्का बसला. तिने तात्काळ पीडितेसह कोन गाव पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन घेतला. सागरला तात्काळ अटक केली. कल्याण, भिवंडी परिसरात बाल लैंगिक अत्याचाराचे प्रकार वाढू लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.