Man Beaten To Death at Mumbra Station : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ एका ४३ वर्षीय व्यक्तीला लोकल ट्रेनमधून ओढून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १ जानेवारी रोजी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. कमालउद्दीन अन्सार शेख असं या व्यक्तीचं नाव असून असून या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा – क्लस्टरसक्तीचा जाच; ठाण्यात अधिकृत घरमालकांचीच कोंडी, नव्या कायद्याला भाजपचा विरोध

police registered murder case after body found on mumbai ahmedabad highway
तो अपघात नव्हे तर हत्या; महामार्गावरील अपघाती मृत्यूचे गूढ उकलले
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Indian Railways Compensation for Death| Compensation for Natural Death in Trains
रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई मिळते का? काय आहेत रेल्वेचे नियम?
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
murder of youth in Bhusawal, murder Bhusawal,
भुसावळमध्ये तरुणाच्या हत्येनंतर पाच संशयितांना अटक
Beed Sarpanch Death by accident
Beed Sarpanch Death: सरपंचाच्या मृत्यूमुळं बीड पुन्हा हादरलं; राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनानं चिरडलं, आमदार सुरेश धसांनी व्यक्त केला संशय
chole bhature Two youth found dead in noida room
Death by chhole: ‘छोले’ बनविणं जीवावर बेतलं, गॅसवर पातेलं ठेवून दोन तरुण झोपी गेले; सकाळी झाला मृत्यू

ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमालउद्दीन अन्सार शेख हा अंबरनाथ येथील रहिवासी असून तो १ जानेवारी रोजी लोकल ट्रेनने आपल्या घरी जाण्यासाठी निघाला होता. मुंब्रा येथे पोहोचताच तीन अज्ञात व्यक्तींनी त्याला ट्रेनमधून खाली ओढले. तसेच त्याला बेदम मारहाण केली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत कमालउद्दीनला रुग्णालयात दाखल केले. मात्र, ४ जानेवारी रोजी त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा – वाचन प्रेरणा दिन उपक्रम : कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयात शारदा मंदिराचे विद्यार्थी ग्रंथसेवक,

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणे पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Story img Loader