डोंबिवलीतील महिलेची बँक व्यवहारातून होणारी फसवणूक टळली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डोंबिवली- ‘तुमच्या घराचा वीज पुरवठा रात्री खंडित होणार आहे. तुम्ही चालू महिन्याचे वीज देयक भरणा केले नाही. त्यामुळे मी सांगेल त्या जुळणीवर संपर्क करा आणि मी सांगेल त्याप्रमाणे कृती करा,’ असे एका भामट्याने डोंबिवलीत ठाकुर्लीत राहणाऱ्या एका महिलेला फोन करून सांगितले. आपण वीज देयक भरणा केला आहे तरी महावितरणमधून फोन का आला म्हणून महिलेने पतीला घडला प्रकार कळविला.

पती सचिन बाबर यांनी तात्काळ भामट्याने केलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधला. भामट्याने पत्नीच्या मोबाईलवर महावितरणचा कर्मचारी म्हणून वीज देयक भरणा करण्यासाठी पाठविलेल्या संदेशांसंदर्भात विचारणा मराठी भाषेतून केली. समोरील व्यक्तिने ‘मी महावितरणच्या कार्यालयातून बोलतो’ असे हिंदी भाषेतून बोलून सचिन यांना हिंदीतून बोलण्याची विनंती केली. आपण वीज देयक भरणा केले आहे तरी आपणास महावितरणमधून फोन का आला. समोरील व्यक्ति हिंदीतून बोलतो म्हणून सचिन बाबर यांनी ‘महावितरणच्या कोणत्या कार्यालयातून बोलता. महावितरणचा प्रत्येक कर्मचारी मराठी चांगले बोलतो असे मराठीतून बोलून भामट्याला तुम्ही कोणत्या कार्यालयातून बोलता ते प्रथम सांगा’ असा आग्रह कायम ठेवला. अखेर मी महावितरणच्या कर्नाटक मधील मध्यवर्ति कार्यालयातून बोलतो. तेथून वीज देयक भरणा करण्याची यंत्रणा काम करते असे हिंदीतून सांगितले. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र विभागातील वीज देयक थकबाकीची कामे आम्ही पाहतो असे भामटा म्हणाला. 

सचिन यांना भामटा मोबाईल मधील प्ले स्टोरमध्ये जाऊन ‘टीम व्यूहर वीज बील’ उपयोजन स्थापित करण्यास सांगत होता. टीम व्यूहर म्हणजे माझ्या मोबाईलमधील सर्व विदा समोरील व्यक्तिच्या ताब्यात जाणार आहे याची जाणीव असल्याने समोरील व्यक्ति आपली फसवणूक करण्याच्या प्रयत्न करत आहे, हे बाबर यांना समजले. बाबर यांनी महावितरणच्या उपयोजनवर जाऊन आपण चालू महिन्याचे वीज देयक भरणा केले आहे की नाही याची खात्री केली. बाबर यांनी महावितरणच्या उपयोजनावर ऑनलाईन चालू महिन्याचे देयक भरण्याचा प्रयत्न केला. त्यांना महावितरणकडून आपण चालू महिन्याचे देयक भरणा केले आहे. पुन्हा तेच देयक भरणा करत आहात, असे संदेश येऊ लागला.

भामटा आपली फसवणूक करत आहे कळल्याने बाबर यांनी भामट्याचा फोन चालू ठेऊन महावितरणच्या कल्याण मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला संपर्क केला. त्यांना घडला प्रकार सांगितला. त्यांनी महावितरण कधीही अशाप्रकारे संपर्क करत नाही. आलेला फोन बनावट इसमाचा आहे, असे सांगून त्याकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले.

बाबर यांनी भामट्याची मजा घेण्यासाठी ‘तुम्ही मराठीतून बोला, तरच मी वीज देयक भरतो, अन्यथा रात्री येऊन बिनधास्त वीज पुरवठा खंडित करा,’ असे सांगितले. बाबर बोलण्यास ऐकत नाहीत. ते आपण सांगितल्याप्रमाणे टीम व्यूहर उपयोजन उघडत नाहीत. भामटा गहिवरून सतत उपयोजन उघडण्याची मागणी करू लागला. बाबर यांनी समोरील व्यक्तिला तुमच्या कार्यालयाचा पत्ता द्या, तुमच्या वरिष्ठाचे नाव सांगा असे सांगून बोलण्यात खिळवून ठेवले. आपण आता फसलो आहोत. समोरील व्यक्तिला फसवू शकत नाहीत हे जाणवल्यावर समोरील भामट्याने स्वताहून फोन बंद केला. आणि बाबर यांची बँक खात्यामधील रक्कम भामट्याच्या बँक खात्यात वर्ग होण्यापासून वाचली. हा अनुभव बाबर कुटुंबीयांनी सांगितला.

गेल्या आठवड्यात कल्याणमधील खडकपाडा येथील घनश्याम पुंजवाणी (६९) या व्यवसायिकाची वीज देयक भरणा केली नाही सांगून भामट्याने ऑनलाईन व्यवहारातून एक लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केली. खडकपाडा पोलीस तपास करत आहेत. महावितरणने गेल्या महिन्यात महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळा शिवाय कोठेही वीज देयक भरणा करू नये. वीज देयकासंदर्भात अज्ञातांकडून आलेल्या फोनची महावितरण कार्यालयात खात्री केल्या शिवाय देयक भरणा करू नये असे आवाहन केले आहे.