Kalyan Crime : लग्नानंतर हनीमूनला काश्मीरला जाण्यावर जावई ठाम होता. मात्र सासऱ्याने त्याच्यावर अॅसिड हल्ला ( Kalyan Crime ) केला. त्यामुळे या माणसाला रुग्णालयात जावं लागलं आहे. कल्याणमधली ही घटना आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. इबाद फालके असं अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या इसमाचं नाव आहे. त्याचे सासरे जकी खोटाल हे हल्ल्यानंतर फरार ( Kalyan Crime ) आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

नेमकी काय घटना घडली?

जकी खोटाल यांच्या मुलीशी इबाद फालकेचं लग्न झालं. त्यानंतर इबादने काश्मीरला हनीमूनला जाण्याचं नक्की केलं. मात्र जावई आणि मुलीने काश्मीरला जाण्यापूर्वी मक्का-मदिना या ठिकाणी जावं असा आग्रह जकी खोटाल यांनी जावई इबादकडे धरला. इबाद मात्र काश्मीरला जाण्यावरच ठाम होता. यामुळे दोघांमध्ये वादावादी झाली. या घटनेनंतर सासरे जकी खोटाल यांनी जावई इबादला कल्याण येथील लाल चौकी भागात गाठलं आणि त्याच्यावर अॅसिड हल्ला ( Kalyan Crime ) केला. या हल्ल्यानंतर जकी खोटाल पळून गेले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

इबाद काश्मीरला जाण्यावर होता ठाम

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार जकी खोटाल यांच्या मुलीचं आणि इबादचं लग्न महिन्याभरापूर्वीच झालं होतं. यानंतर इबादने मधुचंद्रासाठी काश्मीरला जाणं निश्चित केलं. जकी यांनी मात्र आपल्या मुलीने आणि जावयाने आधी मक्का मदीना या ठिकाणी गेलं पाहिजे असा आग्रह धरला. यावरुन दोघांमध्ये वाद होत होते. इबाद पत्नीला घेऊन काश्मीरला जाण्यावर ठाम होता. मात्र जकी यांनी त्याला विरोध दर्शवला. मागच्या महिन्याभरापासून ही धुसफूस सुरु होती. अखेर गुरुवारी जकी यांनी इबादवर अॅसिड हल्ला ( Kalyan Crime ) करत त्याला जखमी केलं.

हे पण वाचा- Kalyan Crime : “मराठी माणसं भिकारी, त्यांना मारा”; म्हणत लोखंडी रॉडने मारहाण; कल्याणच्या सोसायटीत तुफान राडा, नेमकं काय घडलं?

गुरुवारी रात्री नेमकं काय झालं?

इबाद फालके कल्याणच्या लाल चौकी भागातून चालला होता. त्यावेळी त्याचे सासरे जकी खोटाल यांनी इबादला थांबवलं त्या दोघांमध्ये पुन्हा एकदा मक्का की काश्मीर यावरुन वाद सुरु झाला. ज्यानंतर संतापलेल्या जकी खोटाल यांनी इबादवर अॅसिड हल्ला केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे इबाद अस्वस्थ झाला. तर जकी खोटाल यांनी तिथून पोबारा केला. बाजारपेठ पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी गुन्हा नोंद केला. पोलीस आता जकी खोटाल यांचा शोध घेत आहेत. फरार जकी खोटाल यांच्या शोधासाठी पोलिसांची तपास पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. इबादवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत त्याच्या अंगावर आणि चेहऱ्यावर अॅसिड हल्ल्यामुळे जखमा झाल्या आहेत.

Story img Loader