कल्याण पूर्व भागातील खडेगोळवली भागात सोमवारी रात्री एका मित्रानेच आपल्या मित्राची राहत्या खोलीत गळा दाबून हत्या केली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली आहे.
अनिल कुमार यादव असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, अनिल कुमार यादव आणि हिरालाल निशाद हे दोघे मित्र होते. कल्याण भागात असलेल्या एका चप्पल तयार करण्याच्या कारखान्यात काम करतात. खडेगोळवली भागातील एका खोलीत ते एकत्र राहत होते. सोमवारी त्यांनी घरी मेजवानी करण्याचा निर्णय दोघांनीही घेतला. दोघेही मद्यपान करत होते. एकत्र बसले असताना त्यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला. या वादातून हिरालालने अनिल कुमारला बघून घेण्याची धमकी दिली.
अनिल कुमारने हा विषय गांभीर्याने घेतला नाही. परंतु, हिरालालच्या मनात अनिलविषयी चीड निर्माण झाली होती. मद्याची नशा आल्यानंतर अनिल कुमार झोपी गेला. या संधीचा फायदा घेत आरोपी हिरालालने अनिल कुमारची झोपेत असताना गळा दाबून हत्या केली. सकाळीच हिरालाल कामावर निघून गेला. अनिल कुमारचे इतर मित्र त्याला उठविण्यासाठी आले. त्यावेळी तो झोपेतून उठत नव्हता. तो कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नव्हता. मित्रांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन अनिल कुमारचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पालिका रुग्णालयात पाठवला.
पोलिसांनी तातडीने कामाच्या ठिकाणी गेलेल्या हिरालालला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्याने अनिलची हत्या केल्याची कबुली दिली. किरकोळ कारणावरुन ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.