लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : वसंत विहार येथील गावंड बाग भागात एका ३५ वर्षीय व्यक्तीने कौटुंबिक वादातून बहिणीची लोखंडी सळईने प्रहार करून हत्या केल्याचा प्रकार शनिवारी रात्री समोर आला. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्यात १ लाख २९ हजार मतदारांची वाढ

गावंड बाग भागात महिला वास्तव्यास होती. तिचा भाऊ पुण्याहून गावंडबाग येथील तिच्या निवासस्थानी आला होता. शनिवारी रात्री त्यांच्यामध्ये कौटुंबिक वाद झाले. या वादातून त्याने लोखंडी सळईने तिच्या डोक्यात प्रहार केला. महिलेला खासगी रुग्णालयात दाखल केले असता, तिला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Story img Loader