काही महिन्यांपासून पादचारी महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. दुचाकीवरील चोरट्यांनी परिसरात धुडगूस घातला आहे. डोंबिवली पूर्वेतील रामचंद्रनगर भागात सोसायटीत नियमित कचरा उचलण्यासाठी येणाऱ्या महिलेनेच घरात ठेवलेल्या एक लाख रुपये किंमतीच्या मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली आहे.
हेही वाचा- भिवंडी: दुसऱ्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू
गेल्या आठवड्यात कल्याण पूर्वेत असाच प्रकार घडला होता. विष्णु चौधरी (रा. ६३, रा. हरि लक्ष्मी सोसायटी, रामंद्रनगर, डोंबिवली पूर्व) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते सेवानिवृत्त आहेत. चौधरी यांच्या सोसायटीत रेखा बाबू जाधव (३२, रा. पाथर्ली, इंदिरानगर) ही महिला नेहमी कचरा जमा करण्यासाठी येते. गेल्या आठवड्यात विष्णु यांच्या पत्नीने सकाळीच घराचा दरवाजा उघडून कचरा वेचक कामगार रेखा हिच्या ताब्यात कचऱ्याचा डबा दिला. त्या दरवाजा बंद न करताच स्वयंपाक घरात आल्या. यावेळी चौधरी यांच्या घराच्या हॉलमध्ये कोणी नाही पाहून हॉलमध्ये मंचावर काढून ठेवलेले सोन्याचे एक लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र रेखा हिने लबाडीने चोरुन नेले. घरात कोणीही आले नसताना सकाळीच काढून ठेवलेले मंगळसूत्र कोठेही पडले नसताना ते रेखा हिनेच चोरले असल्याचा ठाम संशय व्यक्त करुन विष्णु चौधरी यांनी रेखा विरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.