लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि पणन मंडळ पुरस्कृत संस्कार प्रतिष्ठान व कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. मंगळवार, २ मे ते रविवार, १४ मे या कालावधीत सकाळी १० ते रात्री १० पर्यंत, ठाण्यातील गावदेवी मैदानात या वर्षीचा आंबा महोत्सव होणार आहे.

Tejaswini Bhavan in Akola built with contributions from mahila bachat gat and Sadhan Kendra
अकोला : बचत गटातील महिलांच्या योगदानातून ‘तेजस्विनी’ महाराष्ट्रातील एकमेव पथदर्शी उपक्रम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Devadoot Nidhi activity helps friends financially by encouraging mutual participation and support in times of need
सामाजिक भान देणारा ‘देवदूत निधी’
Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
Arvind Kejriwal
Delhi : महाराष्ट्रात भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ‘या’ केंद्रशासित प्रदेशात राबवणार लाडकी बहीण योजना; नावनोंदणीही सुरू!
MHADA to build seven storey old age home in Majiwada Thane Mumbai news
ठाण्यातील माजीवाड्यात म्हाडा बांधणार सात मजली वृद्धाश्रम; नोकरदार महिलांसाठी वसतीगृही बांधणार
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
more than 1700 retirees people in nashik benefit from DLC scheme of Postal Department
सेवानिवृत्तवेतन धारकांच्या मदतीला टपाल विभाग, जिल्ह्यात १७०० पेक्षा अधिक जणांना डीएलसी योजनेचा लाभ

शेतकऱ्यांना भाव मिळावा आणि ग्राहकांना चांगल्या दर्जाचा आंबा चाखायला मिळावा म्हणून गेल्या १५ वर्षांपासून चळवळीच्या माध्यमातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर, ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठामपा परिवहन सदस्य विकास पाटील, पु.ल.देशपांडे कला अकादमीचे सदस्य मकरंद मुळे, संतोष साळुंखे आदी उपस्थित होते.

हेही वाचा… ठाण्यात ‘ठाणे ईट राईट मिलेट’ मेळावा; भरड धान्याचा आहारात समावेश करण्याबाबत होणार जनजागृती

आंबा महोत्सवात एकुण ४५ स्टॉल्स असणार आहेत, त्यापैकी पाच स्टॉल महिला बचत गटाचे असणार आहेत. कोकणात १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकतो. यंदा अवकाळी पाऊस,ढगाळ हवामान तसेच अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे आंब्याचे उत्पादन घटले आहे. २०२० ला ३ लाख २१ हजार मेट्रिक टन, २०२१ ला २ लाख ५६ हजार मेट्रीक टन , २०२२ ला १ लाख २८ हजार मेट्रीक टन आंबा उत्पादन झाले आहे.या वर्षी देखील अवघे २० टक्के आंबा पीक आले आहे. तेव्हा शेतकऱ्याला पाठबळ देण्यासाठी अशाप्रकारचे आंबा महोत्सवाचे आयोजन केले असल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले.

हेही वाचा… रस्त्यावर खड्डे पडल्यास कारवाई होणार; महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा ठेकेदारांना इशारा

गावदेवी मैदानात आंबा महोत्सवात प्रत्यक्ष विक्री सोबतच ऑनलाईन विक्रीची सुविधाही उपलब्ध ठेवल्याचे आमदार संजय केळकर यानी सांगितले. यासाठी खवय्यांनी राजेंद्र तावडे ९८६९०१६०९२ आणि दिनेश मांजरेकर यांच्याशी ९८१९०९७६५० या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन आमदार केळकर यांनी केले आहे.

Story img Loader