टाळेबंदीमुळे जमिनीवरील आंबा पडून, लाखोंचे नुकसान
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मयूर ठाकूर , लोकसत्ता
भाईंदर : करोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे भाईंदर पूर्वेतील उत्तन येथील सुप्रसिद्ध आंबा हा बाजारात विक्रीसाठी पोहचू न शकल्याने आंबा उत्पादक बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
मुंबई आणि मीरा-भाईंदरपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या उत्तन येथील केशवसृष्टी परिसरात अनेक बागायतदारांनी आंब्याची लागवड केली आहे. याच भागात उत्तनचा राजा अशी ओळख असलेल्या आंब्याच्या प्रजातीसोबत वेगवेगळ्या आंब्याचे उत्पादन घेतले जाते. या विस्तीर्ण पसरलेल्या भूभागात आंब्याच्या अनेक बागा आहेत. येथील प्रत्येक बागायतदार प्रत्येक वर्षी साधारण २५ लाख रुपयांच्या घरात उलाढाल करत असतात. परंतु यंदा ऐन उन्हाळयात करोनाचे संकट ओढावल्याने या बागायतदाराना प्रचंड आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
उत्तन परिसर हा मीरा भाईंदर शहरात आहे. शहरात करोनाबाधित रुग्णाच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत असल्यामुळे प्रशासनाकडून अधिक सक्त पावले उचलण्यात येत आहेत. त्यामुळे तयार झालेले उत्पादन काढण्यासाठी बागेतसुध्दा जाता येत नाही. झाडावरून खाली पडलेला आंबासुद्धा उचलता येत नाही, तर दुसरीकडे मजूरही मिळत नसल्याने मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे बागायतदारांनी सांगितले. उत्तनचा राजा अशी ओळख असलेला हापूस आंबा साधारण एप्रिल आणि मे महिन्यात विक्रीसाठी बाहेर जातो. परंतु यंदा टाळेबंदीमुळे हा आंबा झाडावरच असल्याने मोठे संकट या उत्पादकांवर आले आहे.
मजूर मिळत नसल्याने अडचणी
मोठय़ा प्रमाणात झाडे असल्यामुळे बागायतदाराना कामे करण्यास मजुरांची गरज भासते. परंतु बागेत काम करणारे मजूर हे पालघर जिल्ह्यातील असल्यामुळे त्यांना या भागात आणणे शक्य होत नाही. तसेच उत्तन येथील ग्रामस्थांकडून बाहेर नागरिकांना येण्यास मनाई करण्यात आल्यामुळे आता नेमके करावे काय? असा प्रश्न बागायतदारांना पडला आहे.
किरकोळ विक्री बंदमुळे स्थानिकांचे नुकसान
किरकोळ विक्री बंद झाल्याने स्थानिकांचे नुकसान उत्तन परिसरात गोराई बीच, पॅगोडा आणि एस्सेल वर्ल्डसारखी पर्यटक स्थळे असल्यामुळे उन्हाळयाच्या सुट्टीत मोठय़ा प्रमाणात पर्यटक या भागाला भेट देत असतात. त्यामुळे स्थानीय नागरिक या वेळी आंबे, ताडगोळे तसेच भाजीपाल्यांची विक्री करून रोजगार उपलब्ध करतात. परंतु टाळेबंदी लागू झाल्यामुळे सर्वच बंद असल्याने त्याचा फटका स्थानिक खाद्यपदार्थाची किरकोळ विक्री करणाऱ्या स्थानिक नागरिकांचेदेखील नुकसान झाले आहे.
आम्ही या भागात ऑरगॅनिक पद्धतीने आंब्याची लागवड करतो. त्यामुळे आमच्या आंब्यांना मोठय़ा प्रमाणात मागणी असते. परंतु आता सर्वच ठप्प असल्याने आम्ही आमचे नुकसान कसे सहन करावे, हा आम्हाला प्रश्न पडला आहे.
-मयूर उजगावकर, बागायतदार