मुंबई : ठाणे जिल्ह्यातील तब्बल ९३ हेक्टर कांदळवन क्षेत्र २०२१ ते २०२३ या दोन वर्षांमध्ये नष्ट झाल्याचे ‘भारतीय वन सर्वेक्षण अहवाल २०२३’मधून समोर आले आहे. या अहवालानुसार ठाणे जिल्ह्याबरोबरच मुंबई शहर आणि उपनगरातील कांदळवनेही नष्ट झाल्याचे उघडकीस आले आहे.

झाडे-झुडपे, ताड जातीची झाडे, औषधी वनस्पती, जमिनीलगत वाढणाऱ्या प्रजातींचा समावेश असलेले कांदळवनाचे क्षेत्र पर्यावरण आणि सागरी परिसंस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे मानले जाते. नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘भारतीय वन सर्वेक्षण अहवाल-२०२३’मध्ये ठाणे जिल्ह्यात २०२१ ते २०२३ या कालावधीत ९३ हेक्टर कांदळवन क्षेत्र नष्ट झाले आहे. मुंबई उपनगरांतील १८ हेक्टर, तर मुंबई शहरातील ३ हेक्टर कांदळवन क्षेत्र नष्ट झाल्याचेही अहवालात नमुद करण्यात आले आहे. कोकणातील चार जिल्ह्यांचा विचार करता रायगडमध्ये ७०० हेक्टर, पालघर ४०० हेक्टर, रत्नागिरी १०० हेक्टर आणि सिंधुदुर्ग ५२ हेक्टरने कांदळवनाचे क्षेत्र वाढले आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आमच्याकडे मान-अपमान मनात होतो अन् त्याचं संगीत…”, देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी!
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
pune bangalore highway contractor will change say shivendra singh raje bhosale
पुणे – बंगळुरू महामार्गाचा ठेकेदार बदलणार; शिवेंद्रसिंहराजे, नितीन गडकरींकडून अपूर्ण कामाची दखल
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
decisions in GST Council’s 55th meeting
अग्रलेख: अब तक ५६!
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”

हेही वाचा >>> राज्यात ऐन हिवाळ्यात पाऊस, गारपीट होणार? जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये काय होणार

देशातील कांदळवन क्षेत्राची व्याप्ती २०२१च्या तुलनेत २०२३ मध्ये ७०० हेक्टरने (-७.४३ चौ.किमी) कमी झाली आहे. गुजरातने दोन वर्षांत ३,६३९ हेक्टर क्षेत्र गमावले असून इतर राज्यांत त्यात किरकोळ वाढ झाली आहे. महाराष्ट्राने १,२३९ हेक्टर वाढीसह अव्वल स्थान पटकावले आहे. अत्यंत दाट कांदळवन क्षेत्राच्या यादीत पश्चिम बंगाल (९८,१०० हेक्टर) आघाडीवर आहे. त्याखालोखाल अंदमान आणि निकोबार ३९,८००, ओडिशा ८१०० हेक्टर, तामिळनाडू १०० हेक्टर, तर कर्नाटकमध्ये ११ हेक्टर अत्यंत दाट कांदळवन क्षेत्र आहे.

पायाभूत सुविधांच्या नावाखाली होत असलेल्या ढिसाळ विकासकामांमुळे ठाणे जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील कांदळवनाचे नुकसान होत आहे. जमीन बळकावणे आणि भूमाफियांची प्रकरणे यांची तपासणी करणे आवश्यक आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सरकारची योजना अनेक बारगळली आहे.

बी. एन. कुमारसंचालक, नॅटकनेक्ट फाउंडेशन

Story img Loader