डोंबिवली- जागतिक कांदळवन संवर्धन दिनाचे औचित्य साधून पर्यावरण दक्षता मंडळ डोंबिवली शाखेच्या वतीने डोंबिवली जवळील देवीचापाडा येथील खाडीत विविध जातीच्या खारफुटीच्या रोपांची लागवड करण्यात आली. दोन वर्षापूर्वी याच भागात लावण्यात आलेली खारफुटीची रोपे आता तरारून वर आली आहेत.

जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कल्याण आणि डोंबिवली महसूल विभाग, विक्रोळी येथील गोदरेज खारफुटी विभाग यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात बिर्ला महाविद्यालयाचे वनस्पती शास्त्र विभागाचे विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते.

Joy of Community Farming
निसर्गलिपी : सामुदायिक शेतीचा आनंद
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
When will the dust settle on the Shivaji Park grounds
शिवाजी पार्क मैदानातील मातीचा धुरळा कधी खाली बसणार?
coastal road issue environmentalists oppose giving part of land close to sea to breach candy
कोस्टल रोड मार्गात नवा पेच; भराव भूमीचा भाग ब्रीच कँडीला देण्यास पर्यावरणवाद्यांचा विरोध
Construction of large water channels begins in Gorai Mumbai news
गोराईमध्ये मोठ्या जलवाहिन्या टाकण्यास सुरुवात; काही गावांमध्ये पालिकेच्या कामाला विरोध
JNPA Workshop on Green Port Initiative
जेएनपीएची हरित बंदराकडे वाटचाल; बंदर परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपक्रम
Fire in a cargo vehicle at Chandwad Ghat nashik news
नाशिक: चांदवड घाटात मालवाहू वाहनास आग
Pimpri, Rally cyclists, Indrayani river,
पिंपरी : इंद्रायणी नदी संवर्धन जागृतीसाठी ३५ हजार सायकलपटूंची रॅली

डोंबिवली, कोपर, दिवा, कोपर खाडी किनारा हा खारफुटीच्या जंगलांसाठी प्रसिध्द आहे. या भागात गेल्या १० वर्षात वाळू माफियांनी वाळू उपशासाठी खारफुटीची बेसुमार कत्तल केली. त्यामुळे या भागातील खारफुटीचे जंगल नष्ट होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर खाडी किनारी भागात तीन वर्षापासून खारफुटीची रोपे लावण्याचा उपक्रम पर्यावरण दक्षता मंडळाच्या डोंबिवली शाखेतर्फे हाती घेण्यात आला आहे.

खारफुटीचे महत्व यावेळी उपस्थित बिर्ला महाविद्यालयाच्या उपस्थितांना सांगण्यात आले. खारफुटी जैवविविधता वाढण्यास महत्वाची भूमिका बजावते. खाडीतील अनेक प्रजाती प्रजनन काळात खारफुटीची मुळे, खोडांचा आधार घेतात. अनेक पक्षी खारफुटीच्या झाडांवर घरटी बांधून निवास करतात. खाडी किनारची माती घट्ट धरुन ठेवण्यास खारफुटीची मुळे महत्वाचे काम करतात. खाडी किनारी होणारी धूप थांबविण्यात खारफुटीचे जंगल महत्वाचे कार्य करते, अशी माहिती पर्यावरण दक्षता मंडळाच्या डोंबिवली विभागप्रमुख रुपाली शाईवाले यांनी दिली.

या उपक्रमात पर्यावरण दक्षता मंडळाचे माजी अध्यक्ष डाॅ. पुरुषोत्तम काळे, तलाठी मनोज अडमाने, देवीचापाडा येथील पोलीस पाटील भोईर, गोदरेज खारफुटी संवर्धनाचे व्यवस्थापक हेमंत कारखानीस, बिर्ला महाविद्यालय पर्यावरण विभागप्रमुख डाॅ. तावडे, पर्यावरण दक्षता मंडळाच्या रुपाली शाईवाले सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे उपविभागीय अधिकारी, प्रांत डाॅ. अभिजीत भांडे पाटील, तहसीलदार जयराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

मेसवाक, रेड मॅनग्रोव्हज, ऑरेन्ज खारफुटी, दुधी खारफुटीची रोपे खाडी किनाऱा भागात लावण्यात आली. किनारी दलदल असल्याने बोटीतून विद्यार्थी, पर्यावरण मंडळाचे कार्यकर्ते खाडी किनारी संचार करत रोपे लावण्याचे काम करत होते.  यावेळी विद्यार्थ्यांना पाणकावळे, पाणबगळे, विविध प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी पाहण्यास मिळाले.

जैवविविधता संवर्धनात खारफुटीचे जंगल महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे जागतिक कांदळवनाचे दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीतील देवीचापाडा येथील खाडी किनारी खारफुटीच्या रोपांची लागवड करण्यात आली. दोन वर्षापूर्वी लावलेली रोपे मोठी झाली आहेत.

रुपाली शाईवाले, पर्यावरण दक्षता मंडळ, डोंबिवली

Story img Loader