उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती झाली आहे. मनीषा आव्हाळे या पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या नियुक्तीने उल्हासनगर महापालिकेला पहिल्यांदाच महिला आयुक्त मिळाल्या आहेत. येत्या काळातील महापालिका निवडणुकांच्या तोंडावर झालेली ही नियुक्ती महत्त्वाची मानली जाते.

उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त विकास ढाकणे यांची नियुक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात उपसचिव पदी नुकतीच नियुक्ती झाली. ढाकणे यांचा उल्हासनगर महापालिकेतील काळ अल्प ठरला. त्यांच्याकडून उल्हासनगर महापालिकेला आर्थिक शिस्त लावण्याची आशा होती. मात्र त्यांची त्यापूर्वीच बडली झाली. त्यांच्या बदलीनंतर उल्हासनगरच्या आयुक्त पदावर कुणाची वर्णी लागते याच्या चर्चा रंगल्या होत्या. शेजारच्या पालकांचे प्रशासक किंवा अतिरिक्त आयुक्त यांची इथे बदली केली जाईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र पुणे स्मार्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची उल्हासनगरच्या आयुक्तपदी वर्णी लागली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी याबाबत आदेश जाहीर केले.

हेही वाचा – कुमार आयलानी यांना पुत्रशोक; धीरज आयलानी यांचे निधन, उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

हेही वाचा – डोंबिवलीत खासगी शिकवणी चालिकेच्या भावाचा बालिकेवर लैंगिक अत्याचार

आव्हाळे यांच्या रूपाने उल्हासनगर महापालिकेला महिला आयुक्त लाभल्या आहेत. उल्हासनगर महापालिकेला आर्थिक शिस्त लावणे, शहरातील अनधिकृत बांधकामे आणि पुनर्विकासाचा महत्त्वाचा प्रश्न, रस्ते विकासासह शहरात सुरू असलेल्या कोट्यवधींच्या कामाचा दर्जा राखणे असे अनेक आव्हाने त्यांच्यापुढे आहेत. येत्या काळात उल्हासनगर महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जाते.

Story img Loader