डोंबिवली रेतीबंदर खाडीकिनारी होणाऱ्या माणकोली उड्डाणपुलासाठी मोठा गावातून तयार होणाऱ्या बा’ावळण रस्त्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारात सापडला आहे. अत्यंत महत्वाचा असा हा प्रस्ताव दोन महिन्यापासून रोखून धरण्यात आला आहे. हा रस्ता माणकोलीतील नियोजीत उड्डाणपुल कामासाठी महत्वाचा ठरणार आहे.
ठाणे-डोंबिवली प्रवास वेगवान व्हावा यासाठी राज्य सरकारने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून माणकोली उड्डाणपूलाचे काम हाती घेतले आहे. या कामाची निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. मात्र, हा उड्डाणपूल उभारण्यापूर्वी डोंबिवलीतील मोठागावापासून ४५ मीटरचा बाह्यवळण रस्ता बांधून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी महानगर विकास प्राधिकरण प्रयत्नशील आहे. या कामासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने परवानगी देणे आवश्यक आहे. याशिवाय येथील आवश्यक भूसंपादन करणेही गरजेचे आहे. महापालिकेने यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी विनंती महानगर विकास प्राधिकरणाने महापालिकेकडे केली आहे. असे असताना महापालिकेकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याची धक्कादायक बाब पुढे येत असून यासंबंधी येथील राजकीय वर्तुळात तीव्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
गेल्या दोन महिन्यापूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाने माणकोली उड्डाण पुलासाठी मोठागावामधून ४५ मीटरचा बाह्यवळण रस्ता तयार करण्यासाठी मंजुरी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यावेळी सर्व पक्षीय नगरसेवकांनी या महत्वाच्या विषयावर या रस्त्याची प्रथम पाहणी करू, मग विचार करू, असा निर्णय घेतला. दोन महिने उलटले तरी यासंबंधीची पाहणी झालेली नाही. केरळ व इतर दौऱ्यांवर जाण्यासाठी नगरसेवक जेवढी तत्परता दाखवतात, तेवढी तत्परता ही पाहणी करण्यासाठी का दाखविण्यात आली नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
शिवसेनेचे नेते एकीकडे शहरात येऊन विकासकामांची पाहणी करीत आहेत. विकास प्रकल्प का रखडले याचे अहवाल घेत आहेत. या नेत्यांनी हा महत्वाचा विषय का रखडवून ठेवण्यात आला आहे, असा सवाल परिवहन सदस्य राजेश कदम यांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात उपस्थित केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा