कल्याण : मनसेच्या वरिष्ठ नेत्यांकडून होत नसलेली विचारणा, पक्षाकडून जनहिताचे कार्यक्रम राबविण्यासाठी होत नसलेले मार्गदर्शन आणि स्थानिक नेतृत्वाकडून सतत मिळणारी उपेक्षितपणाची वागणूक, या सगळ्या प्रकाराला कंटाळून कल्याणमधील मनसेच्या महिला, पुरूष शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला. पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या हालचालींनी मनसेला कल्याणमध्ये मोठे खिंडार पडले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे विकासाभिमुक विषयांपेक्षा सातत्याने मुस्लिम विरोधी भूमिका घेत असल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्यांचे म्हणणे मान्य नाही. स्थानिक पातळीवर मनसे पदाधिकाऱ्यांचे मुस्लिम व्यापारी, उद्योजक, कार्यकर्ते यांच्याशी समन्वयाचे संबंध आहेत. असे असताना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे सतत मुस्लिम विरोधी भूमिका पदाधिकाऱ्यांना अडचणीची ठरत आहे. याच कारणामुळे गेल्या वर्षी कल्याण मधील मनसेचे ज्येष्ठ पदाधिकारी इरफान शेख यांनी मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

Sanjay Rathod case, girl suicide, High Court,
संजय राठोड प्रकरण : तपासाला आक्षेप नसल्याचा आत्महत्या केलेल्या तरुणीच्या वडिलांचा उच्च न्यायालयात दावा
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
BJP prepares for election in Shinde group constituency in Khanapur politics news
खानापूरमध्ये शिंदे गटाच्या मतदारसंघात भाजपची कुरघोडी
gauraksha worker beaten up kalyan marathi news
कल्याणमध्ये अ. भा. गौ रक्षा महासंघाच्या कार्यकर्त्याचे अपहरण करून तबेल्यात बेदम मारहाण, जिवंत गाडून टाकण्याची आरोपींची धमकी
Amit Shah Mumbai, Amit shah news,
Amit Shah Mumbai : महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको! अमित शहा यांची सूचना; पक्षाच्या निवडणूक तयारीचा आढावा
security tightened in manipur following fresh violence
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; ड्रोन हल्ल्यांविरोधात इम्फाळमध्ये मोर्चा, पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा
Rajendra Gavit, Palghar Assembly Constituency,
राजेंद्र गावित पालघरसाठी आग्रही
sanjay gaikwad statement on badlapur case
Sanjay Gaikwad : “आता काय मुख्यमंत्री शाळांमध्ये जाऊन पहारा देतील का?”, बदलापूर घटनेवरील आरोपाला उत्तर देताना शिंदे गटाच्या नेत्याचं विधान!

हेही वाचा >>> ठाण्यात ‘ठाणे ईट राईट मिलेट’ मेळावा; भरड धान्याचा आहारात समावेश करण्याबाबत होणार जनजागृती

मुंबईतील नेत्यांकडून नियमित विकासाभिमुख मार्गदर्शन नाही. संपर्क नाही. स्थानिक मनसे आ. प्रमोद पाटील यांच्याकडून कधी पक्ष धोरण, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी करावयाची कामे याविषयी मार्गदर्शन नाही. आ. पाटील यांच्याशी सहज संपर्क साधणे कठीण असल्याच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत. स्थानिक पातळीवर गटातटाचे राजकारण सुरू होते. कार्यकारिणीत निष्ठावान कार्यकर्ते डावलेले जात होते. असेच वातावरण राहिले तर येणाऱ्या पालिका निवडणुकीत लोकांसमोर मनसेचा उमेदवार म्हणून कोणत्या तोंडाने जायचे असा प्रश्न मनसे कार्यकर्त्यांसमोर उभा राहला होता. यामुळेच कल्याण मधील शेकडो मनसे पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा >>> “…पण पालकमंत्री म्हणून मला पाणी सोडता येत नाही!”, चंद्रकांत पाटलांचे विधान

मनसेचे कल्याण शहर संघटक, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष रुपेश भोईर, विभाग अध्यक्ष सुधाकर सानप, शाखा अध्यक्ष अमोल सातवे, वाहतूक सेना सरचिटणीस प्रशांत जाधव, शाखाध्यक्ष योगेश रोकडे, उपविभागाध्यक्ष पंकज ठाकूर, शहर सचिव अश्विन सातवे, चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष नरेंद्र भोईर अशा १५० हून अधिक महिला, पुरुष पदाधिकाऱ्यांनी मुंबईत मातोश्री येथे जाऊन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे उपनेते अल्ताफ शेख, संपर्कप्रमुख रुपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख विजय साळवी, शहरप्रमुख सचिन बासरे, ज्येष्ठ नेते बाळ हरदास, रवी कपोते, विभाग प्रमुख अरुण बागवे उपस्थित होते.

“मनसे अध्यक्षांकडून विकासाभिमुख भूमिका घेण्याऐवजी सातत्याने मुस्लिम विरोधी भूमिका घेतली जात होती. स्थानिक गटातटाच्या राजकारणामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होत होता. याविषयी दाद मागण्याची संधी नव्हती.या वातावरणाला कंटाळून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला.”

– रुपेश भोईर शिवसैनिक, (उध्दव बाळासाहेब ठाकरे).