ठाणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने मोर्चेबांधणी सुरू केली असून ठाणे जिल्ह्यातील तीन आणि पालघर जिल्ह्यातील एक अशा चार जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे शहरात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या वृत्तास ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दुजोरा दिला आहे.

 येत्या सहा महिन्यांत ७० हजारांहून अधिक घरांमध्ये पक्षाचे काम पोहोचविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येकाच्या घरी जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्यूबाबत जाब विचारण्यासाठी महापालिका आयुक्तांची भेट घेण्याचे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

Story img Loader