कल्याण – येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटातून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने, या निवडणुकीत कल्याण, डोंबिवलीतील मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले शिवसेना शिंदे गटातील युवा सेना पदाधिकाऱ्यांसह अनेक नगरसेवक रविवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत, अशी खात्रीलायक माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या कल्याण, डोंबिवलीतील उमेदवारांना रोखण्याचीही व्यूहरचना यामागे असल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या आशीर्वादाने कल्याण डोंबिवली पालिकेत ज्या कुटुंबाने महापौर, स्थायी समिती पदे, एकाच घरात तीन नगरसेवक पदे आणि याशिवाय इतर पक्षीय पदे उपभोगली. अशा कुटुंबातील युवा पदाधिकाऱ्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्यास पुढाकार असल्याचे समजते. या युवा पदाधिकाऱ्याच्या नेतृत्वाने एका विशिष्ट ज्ञातीमधील शिंदे गटातील सुमारे १२ नगरसेवक उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

Devendra fadnavis meet amit shah
नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी, फडणवीस – शहा चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
shinde shiv sena door open to bjp rebels in navi mumbai
भाजपविरोधी बंडखोरांना शिंदे गटाचे दार खुले? पालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी व्यूहरचना
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
Eknath Shinde is now Deputy CM and second ranked leader in Devendra Fadnavis government
एकनाथ शिंदेंचे सरकारमधील स्थान दुसऱ्या क्रमांकाचे, शिंदेंना ‘देवगिरी’
Despite success in the assembly elections the future is challenging for Eknath Shinde
विधानसभा निवडणुकीतील यशानंतरही एकनाथ शिंदे यांच्यासाठी भविष्यकाळ आव्हानात्मक? दिल्लीतील ‘महाशक्ती’चा पाठिंबा अजूनही? 
Ladki Bahin Yojana Updates By Eknath Shinde
Ladki Bahin Yojana : शिंदे दादा आमचा डिसेंबरचा हप्ता कधी देणार? उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच लाडक्या बहिणीचा एकनाथ शिंदेंना सवाल

हेही वाचा – चौकशी लावली असती तर मेट्रो प्रकल्प सुरू झाला नसता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

डोंबिवली मतदारसंघ हा जनसंघापासून भाजपचा पारंपारिक बालेकिल्ला आहे. जगन्नाथ पाटील ते रवींद्र चव्हाण या मतदारसंघाचे नेतृत्व करतात. या मतदारसंघात आता आपणास उमेदवारी मिळावी म्हणून शिंदे शिवसेनेतील एक युवा नेत्याचा आग्रह वरिष्ठांकडे होता. वरिष्ठांकडून या नेत्याला काही दिवस पाठबळ मिळाले. मात्र, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासंदर्भात गेल्या तीन महिन्यापासून आक्रमक उघडपणे या युवा नेत्याने भूमिका घेण्यास सुरूवात केली. मंत्री चव्हाण यांच्या वाढदिवशी त्यांची टवाळकी करणारे फलक या युवा नेत्याच्या सांगण्यावरून शहरात झळकविण्यात आले.

याविषयावरून महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. भाजपने युती धर्म पाळायचा आणि शिवसेनेच्या युवा नेत्याने त्याला बंडाळी करून मूठमाती देऊन महायुतीमध्ये मोडता घालयाचा, असे भाजपच्या वरिष्ठांनी शिवसेनेच्या वरिष्ठांना सुनावले होते. त्यानंतर डोंबिवलीतील युवा नेत्याला शिंदे पिता-पुत्राने अलगद खड्यासारखे बाजुला केले. हा बाजुला करणे, या युवा नेत्याचा पोलीस बंदोबस्त काढणे. या सगळ्या हालचाली या युवा नेत्याच्या जिव्हारी लागल्याने त्याने शिंदे शिवसेनेला रामराम करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – विकासशत्रू महाविकास आघाडीला रोखा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

या युवा नेत्याने गणेशोत्सव काळात पिढ्यानपिढ्याचे वैर असलेल्या आपल्या शत्रुच्या घरी जाऊन गणपती दर्शन घेण्यास मागेपुढे पाहिले नव्हते. त्यामुळे अनेकांना धक्का बसला होता. या युवा नेत्याने शिवसेनेतून अनेक नगरसेवकांना सोबत घेऊन बंडखोरी केली तर त्याची किंमत महायुतीला मोजावी लागेल म्हणून शिवसेनेने या युवा नेत्याला आपल्या मुठीतून सोडले असल्याचे समजते. या युवा नेत्याने डोंबिवली, कल्याणमधील आपल्या ज्ञातीमधील सुमारे १२ नगरसेवक, पदाधिकारी यांचा गट तयार करून उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याची तयारी केली आहे. रविवारी दुपारी हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मातोश्रीवर पार पडणार असल्याचे समजते.

कल्याण पूर्वेत विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेला पण शिवसेनेतून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसलेला एक माजी नगरसेवक या पक्षप्रवेशात आहे. शिवसेनेत (ठाकरे गट) मागील ४४ वर्षापासून निष्ठेने काम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते मात्र या सगळ्या प्रकाराने अस्वस्थ आहेत. ठाकरे गटातील किचन कॅबिनेटमधून शिंदे गटातील बंडखोरांना प्रवेश देण्यात येत असल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना यासंदर्भात भेटले. पण तुम्ही शिवसेना (ठाकरे गट) वाढीसाठी दोन वर्षात काय केले, त्याचा अहवाल द्या, असे पक्षप्रमुखांनी सुनावल्याचे समजते.

Story img Loader