लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणारे माजी नगरसेवक मिराज खान यांच्यासह पदाधिकारी बिलाल शेख (जसबीर ) आणि राजनाथ यादव यांनी नुकताच शरद पवार गटात पक्ष प्रवेश करत घरवापसी केली आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षला रामराम ठोकत अजीत पवार गटात प्रवेश करणारे माजी महापौर नईम खान यांनीही शरद पवार गटात प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धक्का दिल्याचे चित्र आहे.

Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Sharad Pawar Ajit Pawar fb
“बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही” म्हणणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांचा टोला; म्हणाले…
sharad pawar road show chinchwad assembly constituency rahul kalate
भाजपच्या चिंचवडच्या गडात शरद पवार यांचा पहिल्यांदाच रोड-शो; नागरिकांचा प्रतिसाद
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
Ajit Pawar Questionnise the voters of Baramati about the retirement of Sharad Pawar Pune print news
शरद पवारांंच्या निवृत्तीनंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार यांची बारामतीतील मतदारांना विचारणा
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !

ठाणे महापालिकेत एकूण नगरसेवकांची संख्या १३१ इतकी आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेचे ६७ तर, राष्ट्रवादीचे ३४ नगरसेवक निवडुण आले होते. पालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्षाची ओळख होती. तसेच राष्ट्रवादीच्या निवडुण आलेल्या ३४ पैकी २६ नगरसेवक कळवा-मुंब्रा भागातील होते. या भागाचे प्रतिनिधीत्व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे करतात. हा मतदार संघ त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादीतील फुटीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांची तर, जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी अजित पवारांची साथ दिली. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नजीब मुल्ला हे निवडणुक लढविणार असल्याचे बोलले जात असून यातूनच कळवा मुंब्य्रात गेल्या काही महिन्यांपासून पक्ष फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे.

आणखी वाचा-ठाण्यात हिट अँड रन, भरधाव मर्सिडीज कारची तरूणाला धडक, अपघातात तरुणाचा मृत्यू

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा गडाला सुरूंग लावत आठ नगरसेवकांना पक्ष प्रवेश दिला होता. त्यापाठोपाठ काँग्रेस नेते, माजी महापौर नईम खान, त्यांचे चिरंजीव व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक मिराज खान यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. राष्ट्रवादीचा मुंब्य्रातील युवा नेता बिलाल शेख (जसबीर ) याने ही अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने अजित पवार गटाने सर्वत्र फलक लावले होते. या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाड यांना धक्का दिला होता. परंतु काही महिन्यांतच नईम खान, मिराज खान, राजनाथ यादव, जसबीर यांनी शरद पवार गटात प्रवेश करत घरवापसी केली असून या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धक्का दिल्याचे चित्र आहे.