कल्याण: मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी लढा देणारे मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील येत्या सोमवारी कल्याणमध्ये येणार आहेत. मराठा समाजाच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्यानंतर त्यांची कोळसेवाडी भागात पोटे मैदानावर जाहीर सभा होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठा क्रांती मोर्चाच्या कल्याण विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांना कल्याणमध्ये आणण्याचे प्रयत्न मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू होते. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरा करण्याचे जाहीर केले आहे. या दौऱ्याचा भाग म्हणून जरांगे पाटील कल्याणमध्ये येणार आहेत, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा… दिवाळीनिमित्त तरुणाईचा जल्लोष

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागातील पोटे मैदानावर संध्याकाळी सहा वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्याच्या विविध भागातील मराठा समाजाचे कार्यकर्ते या सभेला उपस्थिती लावणार आहेत. या सभेच्या निमित्ताने मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सभेच्या यशस्वीतेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha community activist manoj jarange patil will visit kalyan and a public meeting will be held on monday 20 november dvr