‘कुलवधू’ ही मालिका आठवली की या मालिकेचे शीर्षकगीत आणि त्याची चाल जशी चटकन ओठावर येते त्याचप्रमाणे या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री पूर्वा गोखले आणि तिचा अभिनयही आठवतो. या मालिकेबरोबरच पूर्वा गोखलेने अभिनय केलेल्या आणि गाजलेल्या ‘भाग्यविधाता’ ही मराठी व ‘कोई दिल में है’ तसेच ‘कहानी घर घर की’ या हिंदी मालिकाही लगेचच स्मरतात. अलीकडेच ‘लुकाछुपी’ या नाटकाद्वारे पूर्वा गोखले मराठी रसिकांसमोर आली होती. दीपक नायडू दिग्दर्शित एक मराठी चित्रपटही तिने नुकताच पूर्ण केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

’ आवडते हिंदी चित्रपट :  १९४२ ए लव्ह स्टोरी, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. खरेतर कॉलेजच्या वयात पाहिलेले अनेक हिंदी चित्रपट आवडते असतात. अलीकडचे मात्र तितकेसे सांगता येणार नाहीत.
’ आवडते अभिनेता : शाहरूख खान
’ आवडती अभिनेत्री : माधुरी दीक्षित, काजोल, रानी मुखर्जी
’ आवडता रंग : गुलाबी
’ शॉपिंगचं आवडतं ठिकाण : ठाण्यातच लहानाची मोठी झालेली असल्यामुळे ठाण्यातील नौपाडा गोखले रोड आणि राम मारुती रोडवरची दुकाने याला पर्याय नाहीच. आता कोरम मॉल आणि विव्हियाना मॉलमध्ये शॉपिंग करायलासुद्धा आवडतं.
’ आवडतं हॉटेल :  आणि नौपाडा पोलीस ठाण्याशेजारचं ‘मोनीज् रेस्टॉरंट’ हे खूपच आवडतं हॉटेल आहे. कायमस्वरूपी आवडतं म्हटलं तरी चालेल.
’  ठाणे शहरातील आवडतं  ठिकाण :  येऊर. ठाणे शहराच्या आज जवळ असलेलं परंतु पूर्वी खूप लांब वाटणारं ठिकाण येऊर होतं. त्यामुळे पिकनिक म्हणूनही येऊरच्या गर्द रानात, घाटसदृश रस्त्यावरून गाडीतून फिरणं असेल किंवा पावसाळ्यात धबधबा पाहायला येऊरच्या एकदम टोकाशी सहलीला जाण्याचा अनुभव मजेदार होता.
’ अभिनयाबरोबरच अन्य आवड : अभिनयाची आवड आहेच. परंतु, त्याचबरोबर माझ्या जाऊसोबत आम्ही नुकतंच एक बूटिक ठाण्यात सुरू केलंय. ‘रागा क्लोथ डिझाइन स्टुडिओ’ असं या बूटिकचं नाव असून पाचपाखाडीमधील सरस्वती इंग्रजी शाळेजवळ ते सुरू केलं आहे. फॅब्रिक डिझाइन करून देण्याची हौस या बूटिकच्या माध्यमातून पुरी होतेय.
’ नाटक-सिनेमा की मालिका कोणतं माध्यम अधिक आवडतं  : अभिनयाचं करिअर सुरू होत असताना जवळपास त्याच दरम्यान लग्न जमत आलं होतं. त्यामुळे सुरुवातीच्या काळात मालिकांमधून खूप काम केलं असलं तरी लग्नानंतर विशेषत: मूल झाल्यानंतर मी झेपेल तेवढीच कामे करते. खासकरून एकावेळी मालिका, नाटक, सिनेमा अशा तिन्ही माध्यमांत काम करीत नाही. घर आणि अभिनयाची आवड या दोन्हीचा समतोल साधून सोयीप्रमाणे एका वेळी एकाच माध्यमात काम करणं मला आवडतं. परंतु, व्यावसायिकदृष्टय़ा विचाराल तर मालिका करण्यास मी पसंती देईन. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही सतत प्रेक्षकांच्या समोर येता. अर्थात नाटक माध्यमात कलावंत म्हणून खूप गोष्टी शिकायला मिळतात हेही तितकंच खरं.
’ ठाणे शहराविषयीची गोष्ट  : मी अस्सल ठाणेकर आहे. जन्म ठाण्याचा आहे, लहानाची मोठी ठाण्यातच झाले आणि लग्नानंतरही ठाण्यातच राहतेय. त्यामुळे ठाणे शहर म्हणजे माझं घरच आहे. मी ठाण्याची, माझं ठाणे शहर असं एका वाक्यात मी म्हणेन. होली क्रॉस शाळेत शिकले आणि नंतर जवळच मुलुंडच्या वझे-केळकर कॉलेजमध्ये शिक्षण झालं. अनेक मैत्रिणी आता त्यांच्या लग्नानंतर ठाण्यात राहात नाहीएत. पण मी ठाण्यातच राहिले. नौपाडा, पाचपाखाडी, गडकरी रंगायतन, आजूबाजूची मॉल्स, तलावपाळी, आवडतं मोनीज् रेस्टॉरंट या सगळ्या परिसरात मी वाढलेली असल्याने ठाणे शहर हेच माझं आवडतं शहर स्वाभाविकपणे आहे.
शूटिंगसाठी दूरवरच्या मढ आयलण्डला गेले आणि पुन्हा परतताना दोन तासांचा प्रवास करावा लागत असला तरी टोल नाका ओलांडला की हायसं वाटतं, ठाण्यात आल्याची, घरी पोहोचत असल्याची टोल नाका ही खूण वाटते. त्यामुळे नातेवाईक पश्चिम उपनगरांत राहात असले आणि त्यांच्या घरी गेले आणि उशीर झाला तरी आपण खूप लांब राहतो याची खंत मात्र कधी वाटत नाही. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ठाणे शहराचा उल्लेख आवर्जून करायला हवा.