मराठवाडा जनविकास परिषदेचा मराठवाडा भूषण पुरस्कार डॉ. रमण गंगाखेडकर यांना जाहिर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी ४.३० वाजता गडकरी रंगायतन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे, आमदार संजय केळकर, कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि इतर मान्यवर उपस्थित असणार आहेत. देशाच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन, करोना महामारी तसेच साथरोग नियंत्रणात डॉ. रमण गंगाखेडकर यांचे मोलाचे योगदान आहे.
हेही वाचा >>> दिव्यातील दोन हजार रहिवाशांना दिलासा; १४ इमारती तोडण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
त्यानिमित्त डाॅ. रमण गंगाखेडकर यांना मराठवाडा जनविकास परिषदेचा मराठवाडा भूषण पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा देखील मराठवाडा रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये आज, शनिवार ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता मराठवाडा अमृतमहोत्सवी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. तसेच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची देखील या सोहळ्याला उपस्थिती असणार आहे. या सोहळ्याला मराठवाडावासियांना मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठवाडा जनविकास परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनी केले आहे.