डोंबिवली– येथील पूर्व भागातील सागर्ली गावात एका २० वर्षाच्या विवाहितीने पती बरोबर झालेल्या वादातून इमारतीच्या चौथ्या माळ्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. ही महिला रक्षाबंधन सणासाठी पती बरोबर जळगाव मधील मुक्ताईनगर मधून डोंबिवलीत आली होती. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.
हेही वाचा >>> डोंबिवलीत वाढदिवसाच्या दिवशी वडिलांची पत्नी, मुलांना मारहाण
पुजा करण सोळंके असे मयत महिलेचे नाव आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले, पूजा आपल्या पती बरोबर रक्षाबंधनानिमित्त डोंबिवलीत आपल्या नणंदेच्या सागर्ली मधील घरी आली होती. घरात पाहुण्यांची गडबड होती. सण साजरा करण्याचा उत्साह होता. यावेळी पूजा सकाळच्या वेळेत इन्स्टाग्रामवर अन्य व्यक्तिशी संपर्क देवाणघेवाण करत होती. ‘आपण पाहुणे म्हणून दुसऱ्याच्या घरात आलो आहोत. तु येथे इन्स्टाग्रामवर काय वेळ घालवितेस, तु कोणाशी बोलतेस,’ असा जाब पतीने पूजाला विचारला. त्यावरुन दोघांच्यात वाद झाला. या वादामधून संतापलेल्या पूजाने इमारतीच्या चौथ्या माळ्यावरील गच्चीतून जमिनीवर उडी मारली. ती गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिला डाॅक्टरांनी मृत घोषित केले. मानपाडा पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.