समर्पित जलदगती रेल्वे मार्गासाठी फाटकातील सुरक्षा चौकी तोडण्यासाठी फौजफाटा

कल्याण – दिवा-पनवेल रेल्वे मार्गावरील निळजे गावाजवळील रेल्वे फाटक रेल्वे प्रशासनाने ग्रामस्थांना येण्याची-जाण्याची कोणतीही सुविधा न देता गुरूवारी अचानक बंद केले. तसेच, या रेल्वे फाटकातील सुरक्षा चौकी समर्पित जलदगती रेल्वे मार्गाच्या कामासाठी तोडण्याची कार्यवाही सुरू केली. या तोडकामासाठी रेल्वेचा फौजफाटा निळजे गावात गुरूवारी दाखल होताच, निळजे ग्रामस्थांनी जनआंदोलन करत रेल्वे प्रशासनाच्या कारवाईला विरोध केला.

निळजे गावाजवळून नवी दिल्ली ते जेएनपीटी समर्पित जलदगती रेल्वे मालवाहू मार्ग (डेडिकेटेड फ्रेड काॅरिडाॅर) जात आहे. या कामासाठी निळजे रेल्वे मार्गाजवळील अतिक्रमणे यापूर्वी तोडण्यात आली आहेत. निळजे गावातील ग्रामस्थांचा सर्व व्यवहार रेल्वे फाटकातून पलीकडील बाजारात आहे. त्यामुळे रेल्वे फाटक बंद करण्यापूर्वी या रेल्वे फाटक भागात पादचारी पूल किंवा भुयारी मार्ग बांधून देण्यात यावा. मगच रेल्वे फाटक बंद करावे, अशी मागणी निळजे ग्रामस्थ गेल्या पाच वर्षापासून रेल्वे प्रशासनाकडे करत आहेत.

Municipal employees sealing a property in Kalyan East
कल्याण पूर्वेत थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
life sentence prisoner escapes from yerawada jail pune
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
tigress latest marathi news
महाराष्ट्रातून ओडिशात सोडलेली वाघीण झारखंडमध्ये
Shortage of public toilets in Pune city
वानवा.. स्वच्छतागृहांची
Central Railway security rescued 1099 children in 11 months with police and employee coordination
‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ ; रेल्‍वे सुरक्षा दलाने अकराशे मुलांची केली सुटका
Mumbai subway metro, subway metro passengers Mumbai , Mumbai metro,
भुयारी मेट्रोकडे मुंबईकरांची पाठ, दुसऱ्या महिन्यात प्रवासी संख्येत ६८ हजारांहून अधिकने घट

हेही वाचा >>> सैन्य दलात भरतीचे आमिष दाखवून डोंबिवली, कल्याणममधील भामट्यांकडून ४६ लाखाची फसवणूक

निळजे गावातील शाळकरी मुले या रेल्वे फाटकातून पलीकडील शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी जातात. पलीकडील भागात बाजारपेठ आहे. त्यामुळे गावातील सर्व व्यवहार रेल्वे फाटकातील मार्गातून होत आहेत. हे फाटक बंद केले तर चार किलोमीटरचा वळसा घेऊन एका गैरसोयीच्या पुलाखालून ग्रामस्थांना प्रवास करावा लागेल. हा भुयारी मार्ग ग्रामस्थांना विश्वासात न घेता फक्त विकासकांच्या सोयीने रेल्वेने बांधला आहे. त्यामुळे या भुयारी मार्गात पावसाळ्यात पाणी साचलेले असते. शाळेच्या लहान बस, दुचाकी वाहने या भुयारी मार्गातून जाऊ शकत नाही. मुसळधार पाऊस असला की या ठिकाणी तीन फूट पाणी असते, असे निळजे गावचे ग्रामस्थ प्रकाश पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील बेकायदा राधाई गृहसंकुल तोडण्यास विरोध केल्याने रहिवाशांसह जमावावर गुन्हे

निळजे फाटकाला पर्यायी उपलब्ध करून दिल्याशिवाय रेल्वे फाटक बंद करू नका, अशी मागणी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत रेल्वे अधिकाऱ्यांना करण्यात आली होती. ती मागणी त्यावेळी अधिकाऱ्यांनी मान्य केली होती. तरीही गुरूवारी सकाळी ग्रामस्थांना कोणतीही पूर्वसूचना न देता रेल्वे अधिकारी सुरक्षा जवानांसह निळजे गावात येऊन रेल्वे फाटक त्यांनी बंद केले. या फाटकाजवळील सुरक्षा चौकी समर्पित रेल्वे मार्गासाठी तोडण्याची तयारी रेल्वेने केली आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.

निळजे गावाजवळून मुख्य रस्त्याला जाण्यासाठी पर्यायी रस्ते मार्ग प्रस्तावित आहेत. त्याची अंमलबजावणी व्हायची आहे. रेल्वे फाटक आता तोडून ग्रामस्थांची विशेषता शाळकरी मुलांची गैरसोय रेल्वेकडून केली जात आहे. रेल्वेने प्रथम रेल्वे फाटकाजवळ पादचारी उड्डाण पूल बांधावा, मगच रेल्वे फाटक बंद करावे आणि सुरक्षा चौकी तोडावी अशी आग्रही मागणी निळजे ग्रामस्थांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली. रेल्वे अधिकारी या भागात पादचारी पूल प्रस्तावित असल्याचे ग्रामस्थांना सांगत आहेत. पण पहिले पादचारी पूल रेल्वे फाटकाजवळ उभारा मगच रेल्वे फाटक बंद करा, या विषयावर ग्रामस्थ अडून आहेत. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण आहे.

Story img Loader