ठाणे – घोडबंदर येथील मानपाडा चौकात दोन दुकानांना शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली आहे. घटनास्थळापासून अवघ्या काही मीटर अंतरावर टायटन रुग्णालय आहे. आगीवर नियंत्रण आणण्याचे कार्य अग्निशमन दलाकडून सुरू आहे. या आगीमुळे घोडबंदर मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

मानपाडा चौकात प्लायवूडचे आणि केकचे दुकान आहे. शुक्रवारी सकाळी या दुकानांना अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की अवघ्या काही मिनिटांत या आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हेही वाचा – घर नाहीच; परताव्याचीही प्रतीक्षा! ; विकासकांनी फसवलेले खरेदीदार वाऱ्यावर; महारेराच्या जप्तीच्या आदेशांवर कारवाई संथ

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य अग्निशमन दलाकडून सुरू आहे. या दुकानांपासून काही मीटर अंतरावर टायटन हे खाजगी रुग्णालय आहे. आगीमुळे घोडबंदर मार्गावर मानपाडा ते कापूरबावडीपर्यंत वाहतूक कोंडी झाले आहे.

Story img Loader