ठाणे जिल्ह्यात गोवर रोगाचा प्रभाव कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने सतर्कता बाळगा तसेच संशयित रुग्ण आढळत असलेल्या भागात सर्वेक्षण करून विशेष लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. तसेच जिल्ह्यात गोवर प्रतिबंधात्मक लशींचा मोठ्या प्रमाणात लससाठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>बदलापूरः रिक्षाचालकांचा संप अखेर मिटला रिक्षा चालकांना थांब्याशेजारीच पर्यायी जागा

nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
thane district senior citizen home voting
ठाणे जिल्ह्यात गृहमतदानाला सुरुवात
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
himachal pradesh cm sukhvinder singh sukhu
मुख्यमंत्र्यांसाठीचे सामोसे खाल्ले कुणी? CID करतेय चौकशी; राज्यभर त्याचीच चर्चा!
maharashtra assembly election 2024, Mahayuti Campaign, Palghar, Dahanu,
महायुतीच्या प्रचारात गुजरातमधील निरीक्षकांची देखरेख
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा

गोवर रोगासंबंधी उपाययोजनांसंदर्भात जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा, महापालिका, नगरपालिकांचे वैद्यकीय अधिकारी यांची जिल्हाधिकारी शिनगारे यांनी सोमवारी दुदृश्य प्रणालीद्वारे तातडीची बैठक घेतली. गोवर रोगाची सध्याची जिल्ह्यातील परिस्थिती काय आहे याची माहिती त्यांनी यावेळी घेतली. गोवर रोगाची व्याप्ती वाढू नये यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे. संशयित बालकांची तातडीने चाचणी करून नमुने प्रयोगशाळेत पाठवावे. तसेच ज्या भागात असे रुग्ण आढळले, तेथे जास्त लक्ष द्यावे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे साधारणपणे लसीचा भरपूर साठा उपलब्ध आहे. त्यामुळे आवश्यक तेथे लस पोचविण्यासाठी व्यवस्था यंत्रणेने करावी. किती बालकांना लस अद्यापपर्यंत दिली नाही, त्याची माहिती अद्ययावत ठेवून त्यांच्यापर्यंत लस पोहचेल याची व्यवस्था संबंधित आरोग्य यंत्रणेने करावी. अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच गोवर संसर्गाच्या बालकांसाठी भिवंडीतील आयजीएम, कळवा रुग्णालय, ठाण्यातील पार्किंग प्लाझा येथे विशेष कक्ष तयार करण्यात येतील. रोगाच्या संशयित बालकांना व्हिटॅमिन एचे डोस द्यावेत. तसेच अंगावर पुरळ व ताप असणाऱ्या बालकांना विलगीकरणात ठेवण्यासाठी तयारी करावी. ज्या भागात संशियत जास्त आढळतात तेथे तातडीने सर्वेक्षण सुरू करावे. अशा सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी आरोग्य विभागाला दिल्या.