कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. तृणाली महातेकर यांना पालिका प्रशासनाने निलंबित केले आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी रुक्मिणीबाई रुग्णालयात प्रसूतीसाठी आणलेल्या एका फिरस्ती महिलेला दाखल करून घेऊन तिच्यावर उपचार करण्याऐवजी तिला अन्यत्र जाण्याची सूचना डाॅ. महातेकर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी दिली होती. याप्रकरणी चौकशी समितीने त्यांच्यावर ठपका ठेवला होता.

सप्टेंबरमध्ये रात्रीच्या वेळेत कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर एका फिरस्ती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. पादचारी, महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी, काही महिलांनी या महिलेला तातडीने पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. या महिलेला रुग्णालयाच्या प्रवेशव्दारावर रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रोखून ठेवले होते. याठिकाणी पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. तुम्ही या महिलेला प्रसूतीसाठी अन्य रुग्णालयात घेऊन जा, असे कर्मचारी सांगत होते. या महिलेला तात्पुरते दाखल करून पहिले उपचार सुरू करा, अशी मागणी पोलीस करत होते.

Rajasthan Candidate Who Slapped sdm
‘थप्पड’ प्रकरणाने राजस्थानात तणाव; सरकारी कर्मचाऱ्यांचा संप; अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांना अटक, समर्थकांकडून जाळपोळ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Mangalsutra thief arrested thane, Mangalsutra thief,
ठाणे : महिलेला ढकलून मंगळसूत्र चोरणारा अटकेत
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Brahmagiri Action Committees protest against hill climbing in front of Collectors office suspended
फिरत्या पथकाची आता खाणींवर नजर, वन विभागाच्या आश्वासनानंतर ब्रम्हगिरी कृती समितीचे आंदोलन स्थगित
collector bro kerala ias officer n prashantha suspended
Kelara IAS Officer: ‘कलेक्टर ब्रो’ IAS अधिकारी निलंबित; वरीष्ठ अधिकाऱ्यावर जाहीररीत्या आगपाखड केल्यावरून कारवाई!

हेही वाचा – आपल्याकडे पाहून हसत असल्याच्या संशयातून महिलांकडून तरूणीची हत्या; कळवा येथील घटना

रुग्णालयात त्यावेळी कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. महातेकर आणि इतर कर्मचाऱ्यांनी फिरस्ती महिलेला दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. या महिलेला कोठे दाखल करायचे असा विचार पोलीस करत होते. दरम्यानच्या काळात ती महिला रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशव्दारावरच प्रसूत झाली. या प्रकाराने काही वेळ गोंधळ उडाला.

प्रसूती कळा सुरू असलेल्या एका महिलेला दाखल करून घेण्यास पालिका रुग्णालयाने टाळाटाळा केल्याने सर्व स्तरातून पालिका अधिकाऱ्यांवर टीका सुरू होती. आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड, आमदार प्रमोद पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. पालिकेने अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीने या प्रकरणात घटना घडली त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या डाॅ. महातेकर यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला होता.

हेही वाचा – ठाण्यातील हा आमदार ‘मॉरिशस’मध्ये साकारणार छत्रपती शिवाजी महारांजाची भूमिका

येणारे हिवाळी अधिवेशन, डाॅ. इंदुराणी जाखड आयुक्त म्हणून हजर झाल्यापासून महापालिका अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आहे. या प्रकरणात कोणाची पाठराखण केली तर आयुक्तांकडून कारवाई होऊ शकते, या भीतीने दोन दिवसांपूर्वी पालिकेने महातेकर यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. निलंबन काळात डाॅ. महातेकर यांना दररोज पालिका मुख्यालयात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

“रुक्मिणीबाई रुग्णालयातील प्रसूती प्रकरणात चौकशी समितीने दिलेल्या अहवालावरून वैद्यकीय अधिकारी डाॅ. तृणाली महातेकर यांना प्रशासनाने निलंंबित केले आहे.” – डाॅ. प्रतिभा पानपाटील, प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी