ठाणे : कासारवडवली भागात शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांच्या मारहाणीत जखमी झालेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवती सेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे या गर्भवती नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यांना गंभीर इजा झालेली नसून, मुका मार लागलेला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

फेसबुक पोस्ट टाकण्यावरून ठाकरे गटातील महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे. शोरूमच्या कार्यालयात जाऊन लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. तसेच त्या गर्भवती असूनही त्यांना मारहाण करण्यात आल्याचे दावे ठाकरे गटाकडून करण्यात येत आहेत. परंतु वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्या गर्भवती नसल्याचे उघड झाले आहे.

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray over bag checking
बँगा तपासल्या तर आगपाखड कशासाठी ? श्रीकांत शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका

हेही वाचा – “राज्यात चाललंय काय? महाराष्ट्रातलं गृहखातं कुणाच्या दबावाखाली….” आदित्य ठाकरेंचा तिखट प्रश्न

हेही वाचा – “ज्या मुली आपली पातळी सोडून बोलतात, त्यांना समज देणं आमचं काम”, ठाणे राडा प्रकरणी शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांची भूमिका!

ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात रोशनी यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयाचे डॉ. उमेश आलेगावकर यांनी मंगळवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधून त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती दिली. ही महिला गर्भवती असल्याची दोनदा चाचणी करण्यात आली असून, या दोन्ही चाचण्यांचा अहवाल नकारात्मक आलेला आहे. त्यामुळे ही महिला गर्भवती नसल्याचे स्पष्ट झाले, असे डॉ. आलेगावकर यांनी सांगितले. तसेच महिलेला गंभीर इजा झालेली नसून तिला मुका मार लागलेला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या तिची प्रकृती स्थिर असून केवळ वैद्यकीय निगराणीसाठी तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.