डोंबिवली: राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडुंचा ठसा उमटावा. त्यांना योग्य दिशा देण्यासाठी वेळीच योग्य मार्गदर्शन व्हावे. यासाठी राज्यातील क्रीडा क्षेत्राची दिशा ठरविण्यासाठी गुरुवारी (ता.२६) महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची बैठक डोंबिवली जीमखाना येथे आयोजित करण्यात आली आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार हे यावेळी उपस्थित राहणार आहेत, असे संघटनेचे महासचिव नामदेव शिरगांवकर यांनी सांगितले.ऑलिम्पिक स्पर्धेत यश मिळविण्याची अनेक खेळाडुंची क्षमता असते. काही अडचणींमुळे अनेक खेळाडु तेथेपर्यंत पोहचत नाहीत. या सगळ्या अडचणींची विचार करुन त्याविषयी निर्णय घेणे. शासनाचे या विषयाकडे लक्ष वेधणे, खेळ आणि खेळाडुंचा विकास करण्याच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याने या बैठकीचे आयोजन केले आहे, असे शिरगांवकर यांनी सांगितले.

हेही वाचा >>> ठाणे : एसटी चालकास मारहाण

येत्या काळात ऑलम्पिकमध्ये झेप घेण्यासाठी क्रीडाक्षेत्राची रणनिती कशी असावी. क्षमता असणाऱ्या पण मार्गदर्शन नसणाऱ्या खेळाडुंना योग्यवेळी मार्गदर्शन कसे करायचे. खेळाडुंच्या सुविधा याविषयी या बैठकीत चर्चा करुन त्याचा एक आराखडा तयार केला जाईल. तो आराखडा शासनाला सादर केला जाईल, असे शिरगांवकर म्हणाले.

हेही वाचा >>> रस्ते कामांमुळे ठाणे कोंडण्याची शक्यता?, मे महिना अखेरपर्यंत सर्वच कामे उरकरण्याचे पालिकेचे उद्दीष्ट

या बैठकीला अर्जुन पुरस्कार विजेते अशोक पंडित, ध्यानचंद पुरस्कार विजेते प्रदीप गंधे याशिवाय क्रीडा क्षेत्रातील दिग्गज खेळाडु उपस्थित राहणार आहेत. डोंबिवली जीमखान्याने या पहिल्या बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे. ही बैठक यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे कार्यकारी सदस्य आणि आयोजन समितीचे अध्यक्ष दीपक मेजारी, डोंबिवली जिमखान्याचे अध्यक्ष दिलीप भोईर, टेबल टेनिसचे सचिव यतिन टिपणीस, डोंबिवली जिमखान्याचे सचिव धनंजय कुडाळकर, पर्णाद मोकाशी, टेबल टेनिस खेळाडू सचिन चिटणीस, क्रीडा शिक्षक उदय नाईक, लक्ष्मण इंगळे, प्राचार्य घनश्याम ढोकरट, अविनाश ओंबासे मेहनत घेत आहेत.

Story img Loader