ठाणे आणि कळवा या परिसरातील महापालिकेच्या तरण तलावांचे सदस्यत्व मिळविण्याची प्रक्रीया ऑनलाईनद्वारे करण्यात आली असून त्यानुसार सदस्यत्व मिळविण्यासाठी ऑनलाईनद्वारे अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरु झालेल्या प्रक्रीयेमुळे सदस्यत्व मिळविण्यासाठी तरण तलावाबाहेर पहाटेपासून लागणाऱ्या रांगेतून मुले आणि पालकांची सुटका झाल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>कल्याणमध्ये रेल्वे सुरक्षा बळाच्या अधिकाऱ्याची हवालदाराकडून हत्या

ठाणे शहरातील जलतरणपटूंना सरावाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात तरण तलावांची उभारणी करण्यात आलेली आहे. ठाणे शहरातील गडकरी रंगायतनच्या बाजूला महापालिकेच्या मालकीचा कै. मारोतराव शिंदे तरणतलाव आहे तर, कळवा परिसरात कै. यशवंत रामा साळवी तरणतलाव आहे. या तरण तलावांमध्ये मर्यादीत प्रवेश दिले जातात. यामुळे या तलावांमध्ये पोहोण्यासाठी प्रवेश मिळवण्याकरिताही पालकांना पहाटेपासूनच रांगा लावाव्या लागत होत्या. या तरणतलावांच्या ठिकाणी कमी शुल्क आकारण्यात येत असल्याने येथे सदस्यत्वासाठी गर्दी करणाऱ्यांची संख्या जास्त असायची. रांगा लावूनही प्रवेश मिळाला नाहीतर पालकांच्या पदरी निराशा येत होती. या प्रक्रीयेवरून पालिकेच्या कारभारावर टिका होत होती. या टिकेनंतर पालिका प्रशासनाने तरण तलावांचे सदस्यत्व मिळविण्याची प्रक्रीया ऑनलाईनद्वारे करण्याचा निर्णय घेऊन त्याची गेल्या दोन वर्षांपासून अंमलबजावणी सुरु केली आहे. या ऑ्रनलाईन प्रक्रियेमुळे पालकांची रांगेतून सुटका झाल्याचे चित्र असून यंदाही सदस्यत्व मिळविण्यासाठी हीच प्रक्रीया राबविण्यात येत आहे.

हेही वाचा >>>ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची राज्यभरातून गर्दी

ठाणे शहरातील कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे २५० प्रवेश तर, कळवा परिसरात कै. यशवंत रामा साळवी तरणतलाव येथे १०० प्रवेश दिले जाणार आहे. या प्रवेशाकरिता ऑनलाईनद्वारे अर्ज भरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. १४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते २० फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत ऑनलाईनद्वारे अर्ज स्विकारले जाणार आहेत. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत गडकरी रंगायतन येथे प्राप्त अर्जांची लाॅटरी काढण्यात येणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Membership registration of swimming pools in thane is also online this year amy
Show comments