ठाणे : शहरातील म्युझ फाऊंडेशनच्या वतीने मासिक पाळी याविषयावर उघडपणे व्यक्त होता यावे, याबाबत जनजागृती व्हावी याकरिता दरवर्षी मासिका महोत्सव साजरा केला जातो. ठाण्यातून सुरु झालेल्या या महोत्सवाला विविध देशांमधून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आठवडाभर रंगणारा हा महोत्सव आता यंदाच्या वर्षी पासून सहा महिने रंगणार आहे. या महोत्सवाला १ डिसेंबर २०२४ पासून सुरुवात झाली असून २८ मे पर्यंत हा महोत्सव साजरा केला जाणार असल्याची माहिती म्यूझ फाऊंडेशन मार्फत देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मासिक पाळीबाबत असलेले हे गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी ठाण्यातील म्युझ फाऊंडेशनचे काम सुरु आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचता यावे यासाठी या फाऊंडेशन गेले काही वर्षांपासून मासिका महोत्सव साजरा करत आहे. पूर्वी हा महोत्सव २१ मे ते २८ मे असे आठ दिवस साजरा केला जात होता. परंतू, या मोहत्सवाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून आयोजकांनी यंदाच्या वर्षी पासून सहा महिने हा महोत्सव आयोजित करण्याचे ठरविले. या महोत्सवात कलात्मक कार्यक्रम आणि खेळांच्या माध्यमातून समाजात मासिक पाळीबद्दल खुले आणि प्रामाणिक संभाषण घडवून आणले जाते. स्थानिक संस्थांच्या सहकार्याने देशभरातील १५ राज्यांमध्ये तसेच जगभरातील दहा देशांमध्ये हा उत्सव साजरा करण्यात येतो. बदलते हवामान, सामाजिक गतिशीलता आणि समाजाच्या गरजा यांना अनुसरुन हा महोत्सव ६ महिने साजरा केला जात आहे, अशी माहिती संस्थापक निशांत बंगेरा यांने दिली.

यंदाच्या वर्षी महोत्सवासाठी २४ हून अधिक सभासदांनी महोत्सवाचे आयोजन करण्याची जबाबदारी स्विकारली आहे. यामधील १९ सभासद हे महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, पुदुचेरी व उत्तर प्रदेश या राज्यातून आहेत. या सभासदांच्या सामाजिक संस्था आणि संघटना आहेत. तसेच काही सरकारी विभगांसोबत देखील चर्चा सुरू आहे. त्यासह, नेपाळ, केन्या, पेरू आणि काँगो या देशातून देखील काही संस्थांनी सहभाग नोंदवला आहे, असे म्युझतर्फे सांगण्यात आले.