लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: एकत्रित कुटुंब संस्था टिकून ठेवण्यासाठी कुटुंबात संवाद असणे खूप गरजेचे आहे. या संस्थेतील घटकांमध्ये विसंवादाचे वातावरण असेल तर वेळीच समुपदेशन करणे गरजेचे आहे. संवाद, समुपदेशन कुटुंब संस्था टिकविण्यातील महत्वाचे घटक आहेत, अशी मते डोंबिवली महिला महासंघाने आयोजित एका चर्चासत्रात विविध क्षेत्रातील मार्गदर्शकांनी व्यक्त केली.

Tejaswini Bhavan in Akola built with contributions from mahila bachat gat and Sadhan Kendra
अकोला : बचत गटातील महिलांच्या योगदानातून ‘तेजस्विनी’ महाराष्ट्रातील एकमेव पथदर्शी उपक्रम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
Health Department provided assistance to 2 5 lakh critically ill patients mumbai news
आरोग्य विभागाने अडीच लाख दुर्धर आजाराच्या रुग्णांना दिला मदतीचा हात! पॅलिएटीव्ह सेवेचा करणार विस्तार…
building unauthorized Check Dombivli, Kalyan Dombivli Municipal corporation,
पालिकेच्या संकेतस्थळावर इमारत अधिकृत की अनधिकृत याची खात्री करा, कल्याण डोंबिवली पालिकेचे आवाहन
medha Patkar
समता, न्याय मिळण्याच्या दिशेने कायद्यांमध्ये बदल होणे गरजेचे, मेधा पाटकर यांचे मत
public health department target tb screening of 1 crore people
३ कोटी लोकांची क्षयरोग तपासणी
sex ratio of birth in nashik municipal corporation
जिल्ह्यात लिंगोत्तर प्रमाणात घट; लिंग चाचणीची दक्षता समिती बैठकीत साशंकता

डोंबिवली महिला महासंघातर्फे ‘नवविवाहितांमधील घटस्फोटाचे वाढते प्रमाण – कारणे आणि उपाय’ या विषयावर चर्चासत्र गणेश मंदिरातील विनायक सभागृहात रविवारी आयोजित केले होते. ठाणे कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक प्रतिभा जगताप यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या चर्चासत्रात ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ. मानसी करंदीकर, ॲड. मेघना आंबेकर, मानसोपचार तज्ज्ञ डाॅ. भाविक छेडा, महासंघाच्या संस्थापिका सनदी लेखापाल जयश्री कर्वे, अध्यक्षा प्रा. डाॅ. विंदा भुस्कुटे, उपाध्यक्षा नेत्रा फडके, उपाध्यक्षा सुनिती रायकर, ज्येष्ठ पत्रकार सई बने, संवादिका आरती मुनीश्वर उपस्थित होते.

हेही वाचा… डोंबिवलीत रस्त्यांच्या संथगती कामांमुळे रिक्षा चालकांची मनमानी, रेल्वे स्थानक ते लोढा हेरिटेज आठ रुपये भाडेवाढ

घटस्फोटांच्या वाढत्या प्रमाणामुळे कौटुंबिक न्यायालये वाढविण्याची मागणी होत आहे. समाज व्यवस्थेसाठी हे खूप चिंतनिय आहे. समाज माध्यमांमधील अनावश्यक सहभाग, विवाहबाह्य संबंध, कौटुंबिक संवादात अंतर, व्यसनाधिनता, शारीरिक मारहाण या कारणांमुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे, असे जगताप यांनी सांगितले.

हेही वाचा… डोंबिवली: भोपर-घारिवली रस्त्यावर दुचाकीच्या धडकेत पती-पत्नी गंभीर जखमी

‘एकत्रित कुटुंब पध्दती लोप पावत चालल्याने घरातून आजी, आजोबांकडून होणारा संस्कार आता लुप्त होत चालला आहे. या संस्कारात अनेक पिढ्या घडल्या. आता हे चित्र दुर्मिळ आहे. घरातून मार्गदर्शन होईल, संस्कार होईल, अशी आताची परिस्थिती राहिली नाही. नोकरी, व्यवसायात अडकलेल्या कोणालाही आता कौटुंबिक जबाबदारी नकोशी झाली आहे. विवाह झाला तर मुल नको. कारण त्यांचा सांभाळ कोण करणार, असे प्रश्न उपस्थित करणारी नवदाम्पत्य पाहण्यास मिळत आहेत. या विसंवादाच्या वातावरणात मोबाईलला आता अवास्तव महत्व आले आहे. अशा वातावरणामुळे कुटुंब संस्था ढासळत चालली आहे. यासाठी संवाद, समुपदेशन खूप महत्वाचे आहे,’ असे मत डाॅ. मानसी करंदीकर यांनी व्यक्त केले.

हेही वाचा… डोंबिवली- शिळफाटा रस्त्यावर उलट मार्गिकेतून येणाऱ्या १६७ वाहन चालकांवर कारवाई

‘वसुधैव कुटुंबकमचे गोडवे गाणारे आपण कुटुंब संस्था टिकावी म्हणून फार प्रयत्न करत नाहीत. कुटुंब व्यवस्थेत पण एक व्यावसायिकपणा आला आहे. महिलांमधील व्यसनाधिनता वाढत आहे. स्त्री मुक्तीचा अतिरेक होत आहे. कायद्याचा गैरवापर केला जात आहे. चढाओढीच्या या वातावरणात भावना बोथट होत चालल्या आहेत. यासाठी कौटुंबिक सुसंवाद खूप महत्वाचा आहे,’ असे मत ॲड. मेघना आंबेकर यांनी व्यक्त केले.

‘कुटुंबांमध्ये आता यांत्रिकपणा आला आहे. पाश्चात्यांचे आपण अवास्तव अंधानुकरण करत आहेत. किरकोळ कारणांवरुन वाद निर्माण करुन घटस्फोटासारखे टोकाचे निर्णय घेतले जात आहेत. मानसिक आजाराचे एकेमेकांवर संशय घेऊन पती-पत्नी नात्यात दुरावा निर्माण केला जात आहे. यासाठी कुटुंब, दाम्पत्याने सामोपचाराची भूमिका घेणे महत्वाचे आहे,’ असे मत डाॅ. भाविक छेडा यांनी व्यक्त केले.

घटस्फोटावरील सादरीकरण प्रा. तरुण कुकीयन, प्रा. कौस्तुभ वैजापूरकर यांनी केले. प्रास्ताविक ज्योती कर्वे यांनी केले. आगामी प्रकल्पांची माहिती प्रा. भुस्कुटे यांनी दिली. सूत्रसंचालन सई बने यांनी केले.

Story img Loader