ठाणे – घोडबंदर मार्गावर सुरू असलेले मेट्रोचे काम आणि घोडबंदर टोलनाका येथे मध्यरात्री अवजड वाहन बंद पडल्याने शनिवारी घोडबंदर मार्गाची वाहतूक ठप्प झाली होती. या वाहतूक कोंडीचा परिणाम पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी ते घोडबंदर येथील गायमुख पर्यंत झाला होता. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या चालकांचे हाल झाले. सकाळी १० नंतर वाहतूक कोंडी काहीशी सुटली होती.घोडबंदर मार्गावर मेट्रो निर्माणासाठी गर्डर उभारणीचे काम केले जात आहे. या कामासाठी मानपाडा, पातलीपाडा भागातील रस्ता बंद करण्यात आला होता. तसेच घोडबंदर टोलनाका येथे मध्यरात्री अवजड वाहन बंद पडले. त्याचा परिणाम शनिवारी सकाळी शहरातील वाहतूकीवर झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घोडबंदर, पूर्व द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पहाटे नितीन कंपनी ते गायमुख पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जड-अवजड वाहनांची वाहतूक मुंबई नाशिक महामार्गाच्या दिशेने होऊ लागल्याने साकेत पूलावरही वाहतूक कोंडी झाली होती. ही वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांच्या नाकी नऊ आले. वाहतूक कोंडीमुळे सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडणाऱ्या वाहन चालकांचे, प्रवाशांचे हाल झाले. सकाळी ६ वाजता क्रेनच्या साहाय्याने बंद पडलेले अवजड वाहन रस्त्याच्या बाजूला करण्यात आले. तसेच पहाटे मेट्रोचे काम थाबंविण्यात आले. त्यानंतरही वाहनांचा भार वाढल्याने कोंडी कायम होती. सकाळी १० नंतर येथील कोंडी काहीशी सुटली होती.