ठाणे जिल्ह्यातील बारवी धरण गुरुवारी ८५ टक्क्यांपर्यंत भरल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने बारवी नदीकिनारी वसलेल्या ग्रामस्थांना खबरदारीचा इशारा दिला आहे. धरणाची पाणी पातळी ७०.६४ मिटरवर पोहोचली असून ७२.६० मिटर पाणी पातळी झाल्यास स्वयंचलित दरवाजे उघडून अतिरिक्त पाणी बाहेर सोडले जाणार आहे. त्यामुळे बारवी नदीकिनारी असलेल्या गावांना इशारा देण्यात आला आहे. मात्र पूर्ण क्षमतेने धरण भरण्यास आणखी काही काळ वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> डोंबिवलीतील न्यू आयरे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाच्या पूर्ण क्षमतेने भरण्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असते. बारवी धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत बारवी धरण वेगाने भरते आहे. बारवी धरणाची उंची ७२.६० मिटर इतकी आहे. बारवी धरणाला अकरा स्वयंचलित दरवाजे आहेत. ज्यावेळी ७२.६० मिटर पेक्षा अधिकचे पाणी धरणात जमा होते त्यावेळी स्वयंचलित दरवाजे सक्रिय होऊन अतिरिक्त पाणी सोडले जाते. त्यानंतर ७२.६० मिटर पाणी पातळी पेक्षा कमी झाल्यास हे दरवाजे स्वयंचलित पद्धतीने बंद होतात. गुरुवारी सकाळी बारवी धरणाने ७०.६४ मिटरची पाणी पातळी गाठली होती. त्यामुळे धरणात ८५ टक्के पाणीसाठा झाला होता.

हेही वाचा >>> ठाणे: बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

संततधार पाऊस आणि ठाणे जिल्ह्याला हवामान खात्याने दिलेला नारंगी इशारा पाहता बारवी धरण कधीही भरू शकते. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने बारवी नदीच्या किनारी असलेल्या अस्नोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागांव, पाटीलपाडा, पादीरपाडा, कारंद, मोऱ्याचापाडा, चोण, रहाटोली आणि नदी काठावरील इतर शहरे तसेच शहरातील सरकारी यंत्रणा, गावांतील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांनी गांवातील नागरिकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याबाबत सतर्कतेच्या सूचना देण्याची विनंती करण्यात आली. या काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात नागरीकांना आणि पर्यटकांना प्रवेश न करण्याबाबत तसेच नदीच्या पात्रात पोहण्यास मज्जाव करण्याबाबत सूचना देण्याची विनंतीही एमआयडीसी प्रशासनाकडून करण्यात आली आहे.